मालेगाव : शहरातील इस्लामाबाद भागात मंगळवारी (दि. ३) मध्यरात्री घरात झोपलेल्या कुटुंबावर ॲसिड फेकल्याप्रकरणी पोलिसांनी हसीमुर्र रहेमान तुफैल अहमद (२५, रा. इस्लामाबाद) या संशयितास अटक केली आहे.
मदिना मशिदीमागे राहणारे मोहम्मद लुकमान, त्यांची पत्नी व मुलगी हे तिघे रात्री झोपले असताना त्यांच्यावर ॲसिड फेकण्यात आले होते. यात तिघे जखमी झाले. या गंभीर घटनेची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेत तपासाची चक्रे फिरवली. किल्ला पोलिसांनी २४ तासांच्या आत त्याच भागात राहणार्या हसीमुर्र रहेमान या संशयितास बुधवारी (दि. ४) रात्री ताब्यात घेतले. त्यास न्यायालयाने चार दिवसांची कोठडी सुनावली.