Acid Attack | मालेगावात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबावर अॅसिड हल्ला, तिघे जखमी

परिसरात भीतीचे वातावरण
Acid Attack Malegaon
मालेगावत मध्यरात्री घरात घूसून कुटुंबावर अॅसिड हल्लाfile photo
Published on
Updated on

मालेगाव : इस्लामाबाद भागात अज्ञातांनी घरात अ‍ॅसिड फेकल्याने तिघे जण जखमी झाले. मंगळवारी (दि. 3) मध्यरात्री हा प्रकार घडला. शहरात प्रथमच अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मदिना मशिदीमागे राहणारे मोहम्मद लुकमान व त्यांच्या पत्नी नुजहत परवीन (40) व मुलगी मरियम (18) हे तिघे जण रात्री जेवणानंतर घरात झोपले होते. कुटुंब गाढ झोपेत असताना दरवाजातून आत आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर अ‍ॅसिड फेकले. यात मोहंमद लुकमान व मुलगी हे गंभीर जखमी झालेत. पत्नी नुजहत या किरकोळ जखमी झाल्या. शेजार्‍यांनी तिघांना सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मरियम व लुकमान यांना अधिक उपचारासाठी धुळे येथे वर्ग करण्याचा सल्ला दिला. किल्ला पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. घटना गंभीर असल्याने आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी मागणी केली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news