

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क - 85 कोटींच्या घोटाळा प्रकरणात चौकशीसाठी ED ची टीम मालेगावात दाखल झाली आहे.
मालेगाव येथील प्रमुख आरोपी असलेल्या सिराज अहमदच्या घरी ईडीकडून (Enforcement Directorate) तपासणी सुरू करण्यात आली आहे. नामको बँकेची देखील यावेळी ईडीकडुन चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर छावणी पोलीस ठाणे मालेगाव येथे दाखल झालेल्या गुन्ह्या संदर्भात चर्चा करणार होणार असून व्होट जिहाद साठी हा पैसा वापरला गेल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले होते. बुधवार (दि.13) रोजी सोमय्या यांनी येत्या दोन दिवसांत मोठा धमाका होणार असेही सांगितले होते.