Students Assault Case
Students Assault Casefile photo

Students Assault Case | इगतपुरीत माणुसकीला काळीमा! समाजकल्याण वसतिगृहात दहावीच्या विद्यार्थ्यांकडूनच अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार

Students Assault Case | शहरातील समाजकल्याण विभागाच्या क्सतिगृहात विद्यार्थ्यांसोबत चकादायक घटना समोर आली आहे.
Published on

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा

शहरातील समाजकल्याण विभागाच्या क्सतिगृहात विद्यार्थ्यांसोबत चकादायक घटना समोर आली आहे. वसतिगृहातील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी याच वसतिगृहातील पाचवी ते सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याची धकादायक घटना उघडकीस आली आहे.

Students Assault Case
Nashik Crime : वणी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयिताच्या अटकेसाठी पोलिस ठाण्यावर मोर्चा

शहरातील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील दहावीत शिक्षण घेणाऱ्या सात विधिसंघर्षित विद्यार्थ्यांनी याच वसतिगृहातील अल्पवयीन विद्याध्यर्थ्यांना गुंगीचे औषध देत त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.

या घटनेकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी वसतिगृह अधीक्षक सुशांत दुधसागरे यांच्यासह सात विधिसंचर्षित विद्यार्थ्यांविरुद्ध इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या सात महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याने मोठ्या विद्यार्थ्यांच्या भीतीपोटी पीडित मुलांनी या प्रकाराची वाच्यता केली नाही.

दरम्यान, वसतिगृह अधीक्षक सुशांत दुधसागरे यांना पीडित मुलांनी माहिती दिली होती, मात्र, त्यांनी वाकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. वसतिगृहातील पाचवी ते सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांना भांगेच्या गोळ्या देत झुडपात नेत त्यांच्याशी वेळोवेळी अनैसर्गिक अत्याचार केला. याबाबत उपनिरीक्षक कांचन भोजने, हवालदार नीलेश देवराज तपास करत आहेत.

उच्चस्तरीय चौकशीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

इगतपुरी येथील वसतिगृ‌हातील अल्पवयीन मुलांना गुंगीच्या गोळ्या देत त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाची गंभीर देखल घेत प्रभारी जिल्हा समाजकल्याण अधिकारी संजय शिंदे यांनी बुधवारी (दि.४) वसतिगृहाला भेट दिली. याबाबत प्राथमिक चौकशी अहवाल प्रशासनाला सादर केला.

दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उच्चस्तरीय चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले. जिल्हा समाजकल्याण अधिकारी संजय शिंदे यांनी बुधवारी सकाळी वसतिगृहाला भेट दिली. त्यावेळी वसतिगृह बंद होते, दहावीची परीक्षा असल्याने विद्याथ्यांना घरी काढून दिल्याचे सांगण्यात आले.

मात्र, प्रशासनाने विद्यार्थ्यांना बोलावून घेतले. यानंतर या प्रकाराबाचत विद्याथ्र्यासमवेत चर्चा केली. शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी प्रेमाने समजावून सांगत माहिती जाणून घेतली. विद्याथ्यांनी अनैसर्गिक अत्याचार होत असल्याचे नमूद केले. वा प्रकरणाबाबत वसतिगृह अधीक्षक यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला असला तरी, समाजकल्याण विभाग, जिल्हा प्रशासनाला अंधारात ठेवले. दिवसभर वसतिगृहाची चौकशी करत जिल्हा समाजकल्याण अधिकारी सिदे यांनी चौकशी अहवाल तयार केला. चौकशी कार्यकाळात असतिगृह बंद ठेवण्यात यावे, यासह वसतिगृहातील अनेक त्रुटी निदर्शनास आणून दिल्या.

Students Assault Case
Kumbh Mela 2026 | काम चोख तरच पैसे मिळणार! कुंभमेळ्याच्या प्रत्येक कामावर आता 'त्रयस्थ' संस्थेची करडी नजर

आश्रमशाळेत पडलेली ही घटना गंभीर आहे. याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. बाल संरक्षण समितीलाही याबाबत माहिती दिली आहे. याबाबत अधीक्षकाने या प्रकरणाची दखल न घेता बाहेरगावी निघून गेल्यामुळे तो दोषी आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आश्रमशाळांत गुड टच, बंड टच उपक्रम राबवण्याची गरज आहे.

- आयुष प्रसाद जिल्हाधिकारी, नाशिक

गुन्ह्यातील दहावीत शिकणाऱ्या सात विद्याध्यांना बुधवारी (दि. ४) ताब्यात घेतल्यानंतर या सर्व विद्याथ्यांची इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात तपासणी करण्यात आली. या विद्यार्थ्यांना गुरुवारी (दि. ५) नाशिक येथील प्रधान बाल न्यायालय मंडळात हजर करणार आहे. वसतिगृह अधीक्षकांच्या जबाबयानंतर मुन्द्वात हलगर्जी करणाऱ्या चालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे

सारिका अहिरराव, पोलिस निरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news