Sugandhit pan masala Seizure|इगतपुरीत ६९ लाखांचा प्रतिबंधित सुगंधित पानमसाला जप्त

Igatpuri Pan Masala Seizure | चार जणांवर गुन्हा दाखल; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
Sugandhit pan masala Seizure
इगतपुरी : प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू वाहतूक होत असलेला जप्त करण्यात आलेला मुद्देमाल व वाहन
Published on
Updated on

इगतपुरी : महामार्गावरील बोरटेंभे शिवारात सोमवारी (दि. ३) सायंकाळच्या सुमारास गुटखा वाहतूक करणारी ट्रक येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला गुप्तपणे मिळाली होती. माहिती मिळताच त्यांनी सापळा रचून सुगंधी तंबाखू, गुटखा अवैध वाहतुकीचा आयशर ट्रक ताब्यात घेत सुमारे ६९ लाख २७हजार १९२ रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला व १० लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक असा ७९ लाख २७ हजार १९२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस ठाण्याच्या हद्दीत अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत जनआरोग्यासाठी प्रतिबंधित असलेला ६९ लाख २७हजार १९२ रुपये किमतीचा बेकायदेशीर पानमसाला, सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे.

Sugandhit pan masala Seizure
Political Protest Over Potholes | 'आप'चा थाळीनाद, 'वंचित'कडून तिरडी

या प्रकरणी इगतपुरी पोलिस ठाण्यात अन्न व औषधसुरक्षा अधिकारी सुहास मंडलिक यांनी फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपी दिनेश पूनमचंद शर्मा (४७, वाहनचालक, रा. इंदौर, मध्य प्रदेश), जालिम सिंग (रा. सेंट्रल पॉइंट, इंदौर, मध्य प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे या आरोपीवर याच प्रकारचा गुन्हा ३ जुलैला इगतपुरी पोलिस ठाण्यात दाखल आहे.

चौकशी व तपासानुसार भिवंडी येथील अज्ञात खरेदीदार, वाहनाचे अज्ञात मालक या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी आयशर ट्रक (डीडी ०१ झेड ९३६०) या वाहनात प्रतिबंध केलेल्या 'प्रीमियम राज निवास सुगंधित पानमसाला' आणि 'प्रीमियम झेड-एन-०१ जाफरानी जर्दा' या बेकायदेशीर मालाची भिवंडी येथे विक्री करण्यासाठी वाहतूक केली जात होती.

या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक घनश्याम बळप, अमोल गायधनी, नीलेश देवराज, विलास धारणकर, पी. व्ही. घेगडमल, विजय रुद्रे, कृष्णा गोडसे, पटेकर, मेमाने आदी करीत आहेत.

Sugandhit pan masala Seizure
GPS Tracking Failure in Mineral Transport|जीपीएस गौण खनिजाची वाहतूक टॅगिंगशिवाय

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई

गुप्त माहितीवरून पोलिसांनी बोरटेंभे फाट्याजवळ हा साठा रंगेहाथ पकडला. अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी पंचनामा करून आयशर ट्रकसह एकूण ७९ लाख २७ हजार १९२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news