

नाशिक : ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वर्षभर घरोघरी जाऊन पेपर टाकणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करून 'दैनिक पुढारी'ने वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा केला. दोन ते तीन पिढ्यांपासून हा व्यवसाय करणारे, वयाच्या पंच्याहत्तरीतही सायकलवरून घरोघरी पेपर टाकणारे व पेपरविक्री करून पाल्यांचे उच्चशिक्षणासह कुटुंब सांभाळणाऱ्या विक्रेत्यांचा पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला.
महात्मा गांधी रोड येथे 'दैनिक पुढारी'तर्फे पहाटे विक्रेत्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पवार व पदाधिकारी यांचा दै. पुढारी परिवाराच्या वतीने वितरण व्यवस्थापक शरद धनवटे यांनी विक्रेते उपाध्यक्ष राहुल दुशिंग, महेश मणियार, रमेश महाले, गणेश शेटे, ज्योती जगताप, विनोद पाटील आदींचा गुलाबपुष्प देऊन सन्मान केला. तसेच शहरातील चारही संघटनांचे पदाधिकारी, विक्रेते यांचाही विभागानुसार गौरव करण्यात आला.