HMPV Virus : एचपीएमव्ही व्हायरस; आरोग्य विभाग अलर्ट

Nashik | जिल्हा परिषद आरोग्य विभागाने घेतली बैठक : यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश
Five people are infected with Chinese virus
चिनी व्हायरसची पाचजणांना लागणPudhari file photo
Published on
Updated on

नाशिक : हयुमन मेटाप्न्युमोव्हायरसचे (एचपीएमव्ही) देशभरात रूग्ण सापडले असून महाराष्ट्रालगतच्या गुजरातपर्यंतदेखील हा व्हायरस येऊन पोहोचला आहे. नाशिक जिल्ह्यात याची लागन होऊ नये यासाठी जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. दीपक लोणे यांनी तात्काळ सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेत, शासनाकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांची माहिती दिली. तसेच सर्व अधिकाऱ्यांना योग्य त्या दक्षतेसह तपासणी यंत्रणेला अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (HMPV Virus News)

Summary

आरोग्य विभागाने सर्वसामान्य नागरिकांनी घाबरून न जाता सावध राहण्याचे आवाहन केले आहे. सर्दी-खोकल्याच्या रुग्णांचे नियमित सर्वेक्षण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

एचपीएमव्ही व्हायरसचा पहिला रुग्ण बंगळुरूळमध्ये आढळल्यानंतर हा विषाणू गुजरातपर्यंत अर्थात नाशिकलगतच्या राज्यात पोहोचला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा देखील खडबडून जागी झाली आहे. या व्हायरसचा सामना करण्यासाठी दिल्लीत आरोग्य अधिकाऱ्यांनी काही मार्गदर्शक तत्वे देखील जारी केली आहेत. त्याच धर्तीवर राज्य आणि जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेलादेखील दक्षता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्यासह सर्व प्रकारच्या दक्षतेचे निर्देश दिले.

Five people are infected with Chinese virus
चिनी व्हायरसची पाचजणांना लागण

अशा आहेत सूचना

एन्फ्लूएंझा-सदृश आजार आणि जास्त प्रमाणात श्वसन संक्रमणचे कोणतेही प्रकरण समोर आल्यास त्याची माहिती त्वरित कळवावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

बैठकीत दिलेल्या सूचना

  • संशयित रुग्ण आढळून आल्यास कठोर पावले उचलत त्याला क्वारंटाइन करावे.

  • खबरदारी म्हणून यंत्रणा सज्ज ठेवावी.

  • ज्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे किंवा संशयित रुग्ण आहेत, त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवावे.

  • या व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी सर्व रुग्णालयामध्ये आवश्यक औषधसाठा करावा- ऑक्सिजन, ब्रॉन्कोडायलेटर्स, अँटीहिस्टामाईन, पॅरासिटेमॉल आणि कफ सिरप हे औषधे रुग्णालयात ठेवावे.

सर्दी, खोकला असलेल्या रुग्णांची नियमित तपासणी केली जात आहे. यात श्वसनाचा त्रास होत असेल, किंवा संशयित रुग्ण आढळल्यास त्यांना आयसोलेशमध्ये ठेवले जात आहे. याबाबतचा अहवाल दररोज सादर करण्याचे आदेश दिले आहे.

डॉ. राजेंद्र बागुल, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news