नाशिकमध्ये पुन्हा हिट अँड रन प्रकरण; महिला पाच फूट उडाली, जागीच मृत्यू

पुणे पाठोपाठ नाशकात हिट अँड रन प्रकरण, महिला पाच फूट उडाली
Beed  Accident News
वारकऱ्याचा अपघातात मृत्यू झाला.File Photo

सातपूर : पुणे पाठोपाठ नाशिकमध्येही हिट अँड प्रकरण समोर आले आहे. गंगापूर रोड येथील बारदान फाटा परिसरात एका ३१ वर्षीय महिलेला एका चारचाकीने धडक देत पलायन केल्याचे समोर आले आहे. या धडकेत एका ३१ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे..

Beed  Accident News
Nashik Accident | नाशिकमध्ये पुन्हा हिट अॅण्ड रन; टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू

अर्चना किशोर शिंदे (रा. मोतीवाला महाविद्यालया जवळ) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगळवार (दि.९) सायंकाळी अर्चना शिंदे या बारदान फाट्याकडून मोतीवाला महाविद्यालयाकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातामध्ये अर्चना शिंदे या पाच फूट लांब उडाल्या आणि थेट रस्त्यावर कोसळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. घटनास्थळी गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी भेट घत घटनेची माहिती घेतली असून पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news