Yeola News | शोषितांच्या मुक्तीची सिंहगर्जना अन् 91 वर्षांचा प्रेरक-वैचारिक प्रवास

Yeola News | या ऐतिहासिक घटनेच्या ९१ व्या वर्धापन दिनानिमित्त घेतलेला मागोवा.
Dr Babasaheb Ambedkar
Dr Babasaheb Ambedkar
Published on: 
Updated on: 

संतोष घोडेराव


'मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही!' ही केवळ वाक्ये नव्हती, तर शतकानुशतके विषमता आणि अन्यायाच्या अंधारात खितपत पडलेल्या कोट्यवधी शोषितांच्या मुक्तीची एक ऐतिहासिक सिंहगर्जना होती.

Dr Babasaheb Ambedkar
Nashik Drought Declaration | नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर; मात्र पंचनाम्यांच्या धीमी गतीमुळे शेतकऱ्यांची मदत रखडली

१३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला या ऐतिहासिक भूमीत भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी केलेली ही ऐतिहासिक घोषणा भारताच्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय इतिहासाला एक कलाटणी देणारी ठरली. या ऐतिहासिक घटनेच्या ९१ व्या वर्धापन दिनानिमित्त घेतलेला मागोवा.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांना समाजात समान अधिकार, मानवी हक्क आणि पाण्याचे-मंदिराचे अधिकार मिळवून देण्यासाठी 'महाडचा सत्याग्रह' आणि 'काळाराम मंदिर सत्याग्रह' यांसारखे अनेक अहिंसक लढे दिले.

मात्र, एवढे लढे देऊन आणि प्रदीर्घ संघर्ष करूनही सनातनी हिंदू समाजाच्या मानसिकतेत कोणताही मूलभूत बदल होत नव्हता. अस्पृश्यांना मानवी हक्क नाकारले जात होते, शिक्षणापासून वंचित ठेवले जात होते आणि पावलोपावली अपमान सोसावा लागत होता. हक्कांची मागणी करूनही जेव्हा हिंदू धर्मातील विषमता संपत नाही हे स्पष्ट झाले, तेव्हा बाबासाहेबांनी यावर अंतिम आणि धोरणात्मक तोडगा काढायचे ठरवले.

१३ ऑक्टोबर १९३५ येवल्यात सिंहगर्जना:

  • १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथील कोर्ट मैदान येथे 'मुंबई प्रांत अस्पृश्य परिषद' भरवण्यात आली होती. संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो नागरिक आणि कार्यकर्ते या परिषदेला उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे डोळे आणि कान डॉ. आंबेडकरांच्या भाषणाकडे लागले होते.

  • आपल्या अभ्यासापूर्ण आणि ओजस्वी भाषणात बाबासाहेबांनी हिंदू धर्मातील जातिव्यवस्था आणि विषमतेवर प्रखर प्रहार केले. ते म्हणाले, "अस्पृश्यांनी हिंदू समाजात राहून आत्मसन्मान मिळवण्याचा केलेला प्रयत्न व्यर्थ ठरला आहे. ज्या धर्मात माणसाला माणसासारखी वागणूक मिळत नाही, तिथे राहण्यात काहीही अर्थ नाही." आणि याच भाषणाच्या शेवटी त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि क्रांतिकारक निर्णय जाहीर केला. 'मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही' या एका वाक्याने देशातील सामाजिक-धार्मिक विद्वानांना हादरवून सोडले.

  • निर्णयामागची भूमिका ही भावनिक नाही, तर वैचारिक क्रांती होती. येवला येथील घोषणा हा कोणताही तात्कालिक राग किंवा भावनिक उद्रेक नव्हता, तर तो अत्यंत सखोल अभ्यासावर आधारित वैचारिक निर्णय होता. मानवी हक्कांची पुनर्रचना अस्पृश्यांना केवळ राजकीय अधिकार नव्हे, तर आत्मसन्मान आणि नैतिक स्वातंत्र्य हवे होते. जातिव्यवस्थेचा अंत बाबासाहेबांच्या मते, हिंदू धर्माचा पायाच वर्णव्यवस्था व जातिव्यवस्थेवर आधारित असल्याने त्यात सुधारणाला वाव नव्हता. शोषितांना अशा धर्माची गरज होती जिथे प्रत्येकाला समानतेची आणि बंधुतेची वागणूक मिळेल.

Dr Babasaheb Ambedkar
Nashik Drought Declaration | नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर; मात्र पंचनाम्यांच्या धीमी गतीमुळे शेतकऱ्यांची मदत रखडली

२१ वर्षांच्या चिंतनानंतर १४ ऑक्टोबर रोजी धम्मक्रांती:

  • येवला परिषदेत घोषणा केल्यानंतर बाबासाहेबांनी घाईघाईने कोणताही नवीन धर्म स्वीकारला नाही. त्यांनी २१ वर्षे जगातील प्रमुख धर्मांचा (बौद्ध, ख्रिश्चन, इस्लाम, शीख आदी) सखोल अभ्यास केला.

  • अखेर १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह भारताच्या भूमीतिल तथागत भगवान बुद्धांच्या कारुण्य, प्रज्ञा आणि समता या तत्त्वांवर आधारलेल्या बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि येवला मुक्कामी केलेली ऐतिहासिक प्रतिज्ञा पूर्ण केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news