Vipashana Banode Death Case | चारवर्षीय विपशना बनसोडे मृत्यू प्रकरण; जिल्हा शल्यचिकित्सकांकडून उच्चस्तरीय चौकशी सुरू

Vipashana Banode Death Case | उपचारांची कागदपत्रे, हिस्टोपॅथी व पीएम रिपोर्ट सादर करण्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांचे निर्देश
Child death
Child deathPudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
चारवर्षीय विपशना मिलिंद बनसोडे हिच्या मृत्यूप्रकरणी प्रशासनाकडून चौकशीच्या दिशेने पावले उचलण्यात आली असून, खासगी रुग्णालयातील निष्काळजीपणा आणि महापालिकेच्या डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजनांतील त्रुटींची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुलीचे वडील मिलिंद बनसोडे यांनी केली होती.

Child death
Mission Chara Plan | जून 2027 पर्यंत नाशिक जिल्हा राहणार पूर्णपणे टंचाईमुक्त; प्रशासनाचा महत्त्वाकांक्षी 'मिशन चारा' प्लॅन तयार

या अनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने उपचारांश संबंधित सर्व कागदपत्रांसह हिस्टोपॅथी आणि शवविच्छेदन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीला महत्त्व आले आहे.
मिलिंद बनसोडे यांनी २६ सप्टेंबर रोजी या संदर्भात तक्रार अर्ज केला होता. त्यानंतर गुरुवारी (दि. ८) जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा शल्यचिकित्सक आणि समिती सदस्यांमध्ये याबात चर्चा झाली होती. या चर्चेच्या अनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने बुधवारी (दि. १४) बनसोडे यांना पत्र पाठवित विपशनावर झालेल्या उपचारांश संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तावेज सादर करण्यास सांगितले आहे.

पोलिसांमार्फत कागदपत्रे सादरचे निर्देश

उपचारांचे सर्व अभिलेख, हिस्टोपॅथी अहवाल आणि पीएम रिपोर्टवर बहुविशेषज्ञांकडून अंतिम अभिप्राय घेतलेल्या प्रती पोलीस ठाणे अथवा न्यायालयामार्फत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे सादर करण्याचे पात्रात नमूद करण्यात आले आहे. या कागदपत्रांची तपासणी जिल्हास्तरीय समितीमार्फत तपासणी करीत पुढील कार्यवाही करणे शक्य होणार असल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार शिपी यांनी स्पष्ट केले आहे.

Child death
Mission Chara Plan | जून 2027 पर्यंत नाशिक जिल्हा राहणार पूर्णपणे टंचाईमुक्त; प्रशासनाचा महत्त्वाकांक्षी 'मिशन चारा' प्लॅन तयार

चौकशीच्या निष्कर्षाकडे लक्ष

विपशनाच्या मृत्यूमागील नेमकी कारणे, खासगी रुग्णालयातील उपचारांत काही त्रुटी होत्या का आणि डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये मनपा आरोग्य यंत्रणेकडून कसूर झाली का, या मुद्द्यांवर तक्रारदाराने चौकशीची मागणी केली आहे. मात्र, या आरोपांबाबत अंतिम निष्कर्ष समोर आलेला नाही. संबंधित वैद्यकीय कागदपत्रेची तपासणी आणि समितीच्या अभिप्रायनंतरच दिशा स्पष्ट होणार आहे. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी होऊन सत्य समोर यावे, दोषींवर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news