Nashik Tourists Stuck In Nepal | नेपाळ पुरामध्ये नाशिकचे पर्यटक अडकल्याची भीती; प्रशासनाकडून तातडीने मदत मोहीम सुरू!

Nashik Tourists Stuck In Nepal | कुटुंबीयांनी ऑनलाइन माहिती नोंदविण्याचे प्रशासनाचे आवाहन
Nepal Flood VIDEO
Nepal Flood VIDEOPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, विविध देशांसह महाराष्ट्रातील अनेक पर्यटक तिथे अडकले आहेत. यात नाशिकमधील पर्यटक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून त्यांच्यापर्यंत आवश्यक मदत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे.

Nepal Flood VIDEO
Nashik Malnourished Children | नाशिक जिल्ह्यात 3,672 बालके कुपोषित; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे निर्मूलनाचे कडक आदेश!

नाशिक जिल्ह्यातील कोणतेही नागरिक किंवा पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्यास त्यांच्या कुटुंबीयांनी किंवा नातेवाईकांनी प्रशासनाला तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी केले आहे.


अडकलेल्या व्यक्तीचे नाव, संपर्क क्रमांक, ठिकाण आणि उपलब्ध असलेली अन्य आवश्यक माहिती ऑनलाइन नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांच्या माहितीचे संकलन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ऑनलाइन लिंक उपलब्ध करून दिली आहे.

Nepal Flood VIDEO
Vidit Gujrathi interview : नाशिक ते ग्रँड स्विस टूर्नामेंट... ग्रँडमास्टर विदित गुजराथींचा 'अर्जुन' ठरण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

नाशिक जिल्ह्यातील अडकलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांनी https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/ या लिंकवर जाऊन संबंधितांची सविस्तर माहिती भरावी. या माहितीच्या आधारे अडकलेल्या नागरिकांशी संपर्क साधून आवश्यक मदत व समन्वय साधण्यास प्रशासनाला मदत होणार आहे.

नेपाळमध्ये गेलेल्या नातेवाईकांशी संपर्क होत नसल्यास किंवा ते पुरामुळे अडकल्याची माहिती असल्यास कुटुंबीयांनी विलंब न करता ऑनलाइन नोंदणी करावी. तसेच आवश्यकतेनुसार नाशिक जिल्हा नियंत्रण कक्षाशी ०२५३-२३१७१५१ यावर संपर्क साधावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news