

नाशिक : मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याला झोडपले असून सर्वत्र हाहाकार माजविला आहे. त्र्यंबकमध्ये वीज पडून 25 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला तर येवल्यात वीज पडून मायलेकी जखमी झाल्या आहेत. या शिवाय नांदगावमध्ये गाय आणि बैल ठार झाले. हवामान खात्याने पुढील दोन दिवस सावधानतेचा इशारा दिला आहे.
दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची धुवधार बॅटींग सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. त्र्यंबक तालुक्यात ओहळ येथील जगदीश सिताराम लहारे (25) या युवकाच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला. येवल्या पिंपरी येथे घराची भिंत कोसळून पडल्याने नुकसान झाले. नगरसुलला अनेकाच्य घरावरील पत्रे उडाले. यात मायलेकी जखमी झाल्या आहेत. नांदगावलाही पावसाने झोडपले, परधाडी येथे वीज पडून अरुण नानासाहेब पवार यांच बैल मृत झाला. कुसुमतेल येथे शेतकरी सिन्नर तालुक्यातही वीज पडून बैल दगावला.