Nashik Simhastha Kumbh Mela | कुंभमेळा ध्वजारोहण बैठकीत माजी महापौर - आयुक्तांमध्ये वाद

Nashik Simhastha Kumbh Mela | रामतीर्थावरील कामांना गतीबाबत मनपाचा निर्णय
Nashik Simhastha Kumbh Mela
Nashik Simhastha Kumbh Mela
Published on
Updated on

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण आणि ग्राम परिक्रमेच्या पूर्वतयारीसाठी शनिवारी (दि. १२) श्री शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण संस्थेत रामसेतू पुलाजवळ बैठक आयोजित करण्यात आली होती. या विचारविनिमय बैठकीत माजी महापौर दशरथ पाटील आणि मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्यामध्ये नियोजनाच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी झाली.

Nashik Simhastha Kumbh Mela
Nashik Police | नाशिक पोलिसांची मोठी कारवाई; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 402 उपद्रवींवर हद्दपारीचा बडगा

बैठकीत सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या रूपरेषेवर चर्चा करण्यात आली. रामतीर्थावरील कामे मार्गी लावण्याचे निर्देश दिले. बैठकीदरम्यान दि. ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळा नियोजनाची माहिती आयुक्त मनीषा खत्री यांनी स्पष्ट केली. नियोजनाच्या मुद्द्यावरून माजी महापौर दशरथ पाटील यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले.

या वेळी महापौर आणि आयुक्त आपापसात बोलत असल्यामुळे 'मी अनेक कुंभमेळे पाहिले असून, असा गलथान कारभार कधीही पाहिला नाही, तुम्हाला हिंदू धर्माचे महत्त्व नाही.' असे म्हणत त्यांनी आयुक्तांना धारेवर धरले. यावर आयुक्तांनी सडेतोड उत्तर देत, 'तुम्ही मला धार्मिक भावनांच्या बाबतीत सांगू नका, काही मंदिरे पाडण्याबाबत तुम्ही स्वतः अर्ज केलेला आहे,' असा प्रतिप्रश्न केला. पंचवटी भाजप शहराध्यक्ष राहुल कुलकर्णी यांनी मध्यस्थी करीत वाद शांत केला.
रामकुंडावरील शौचालय पाडल्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात स्वच्छतागृह उभारण्याची मागणी मान्य करण्यात आली.

काँग्रेस शहराध्यक्ष बबलू खैरे यांनी हा सोहळा राजकीय नसून, हिंदू धर्मासह नाशिककरांचा आहे. त्यामुळे सर्व पक्ष, नागरिक, साधू-संत, सामाजिक व धार्मिक कार्यकर्त्यांनीही यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. सिंहस्थ ध्वजारोहण पूर्वतयारीबाबत पुढील बैठक ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. बैठकीस महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी महापौर सतीश कुलकर्णी, महंत भक्तिचरणदास, महंत रामकिशोरदास शास्त्री,

महंत रामस्नेहीदास शास्त्री, महंत अनिकेतशास्त्री, रवींद्र पुरी, माधवदास राठी, अतिरिक्त आयुक्त प्रदीपक चौधरी, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, निवासी जिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, राजेश दरगोडे, चंद्रशेखर पंचाक्षरी, सतीश शुक्ल, दिलीप शुक्ल, नीलम पाटील, जुई शिंदे, देवांग जानी, लक्ष्मण सावजी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news