

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क | मल्हार प्रमाणपत्रानुसार, महाराष्ट्र राज्यात मटण विकणारी दुकाने नोंदणीकृत असतील. नितेश राणे यांनी लोकांना आवाहन केले आहे की, ज्या दुकानांमध्ये मल्हार प्रमाणपत्र उपलब्ध असेल त्या नोंदणीकृत दुकानातूनच मांस विकत घ्या. या मटण दुकानांमध्ये कोणत्याही प्रकारच्या मांसाची भेसळ होणार नाही आणि ती हिंदूकडून चालवली जातील. सरकारच्या या मोहिमेद्वारे हिंदू तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, असे नितेश राणे यांनी सांगितले आहे. (What is the exact difference between Jhatka and Halal?)
देशात विविध प्रकारच्या कामांसाठी तुम्हाला अनेक प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. जे तुमच्या वेगवेगळ्या कामांसाठी आवश्यक आहेत. नुकतेच महाराष्ट्रात नवीन प्रमाणपत्र देण्यात आले आहे. मल्हार प्रमाणपत्र असे या प्रमाणपत्राचे नाव आहे. मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी मल्हार प्रमाणपत्र लाॅन्च केले आहे. नितीश राणे यांनी तमाम हिंदूंना महाराष्ट्रात फक्त हिंदूंच्या दुकानातूनच मांस खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. या दुकानांमध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ होणार नाही.याची खात्री करण्यासाठी मल्हार प्रमाणपत्र सुरू करण्यात आले आहे. मल्हार प्रमाणपत्र म्हणजे काय आणि ते कोणाला दिले जाते?
महाराष्ट्र सरकारचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितीश राणे यांनी सोमवार, दि. 10 मार्च रोजी महाराष्ट्रात मल्हार प्रमाण नावाचा नवीन उपक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्रातील झटका मांस दुकानांसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील या सर्व मांस दुकानांची नोंदणी मल्हार प्रमाणपत्राद्वारे केली जाणार आहे. नोंदणी झाल्यानंतर या सर्व दुकानांना मल्हार प्रमाणपत्र दिले जाईल. या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व मांसाची दुकाने हिंदू चालवतील. राज्यातील सर्व झटका मटण आणि चिकन विक्रेत्यांच्या नोदणींसाठी पोर्टल सुरु करण्याची घोषणा केली आहे. या सर्व नोंदणीकृती मांस विक्रेत्यांना 'मल्हार प्रमाणपत्र' दिले जाणार आहे. या प्रमाणपत्रानुसार, महाराष्ट्रात मटण विकणारी दुकाने नोंदणीकृत असतील.
कोणत्याही परंपरेच्या मागे भौगोलिक कारणे असतात आणि त्या त्या भूमीतील लोकांनी त्याला धर्माशी संलग्न केलेले असते. पण हा धर्माचा विषय नसून भौगोलिक परिस्थितीशी निगडीत विषय असतो पण अश्या पद्धतीने कोणी विचारच करत नाही. इस्लामचा उदय वाळवंटात झाला. तिथे पाण्याचे दुर्भिक्ष्य , अन्नाचे दुर्भिक्ष्य. जे मिळेल ते पुरवून पुरवून खाल्ले तरच तुम्ही जगू शकता. त्यामुळे तिथे हलाल पद्धती रूढ आहे. हलाल पद्धतीने तुम्ही प्राण्याचा गळा चिरला तर त्याच्या शरीरातील सगळे रक्त वाहून जाते. तो प्राणी वेदनेने तडफडेल, पण शरीरातील सगळे रक्त वाहून गेल्याने तो प्राणी साफ करून खाण्यासाठी तुम्हाला त्याला धुवावे लागेल त्यावेळी कमी पाणी वापरण्याची गरज पडेल. पाणी ही वाळवंटात सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तिचा कमीत कमी वापर होणे हे त्यांच्यासाठी अत्यावश्यक होते. दुसरा मुद्दा संपूर्ण रक्त वाहून गेल्याने त्या प्राण्याच्या शरीरात जीवाणू आणि विषाणू तयार होण्याची प्रक्रिया पूर्ण खंडित होते आणि त्यामुळे ते मांस अधिक काळ टिकू शकते. जिथे जगण्याचा संघर्ष अत्यंत तीव्र आहे तिथे हे दोन्ही मुद्दे दुर्लक्षिले जाऊ शकत नाहीत. परंतु भौगोलिक परिस्थितीमुळे केल्या जाणाऱ्या कृतीला धर्माशी संलग्न केल्याने भारतासारख्या किंवा पाश्चिमात्य देशांमध्ये सुद्धा जिथे पाणी मुबलक आहे तिथे देखील मुसलमान लोक आमची धार्मिक श्रद्धा आहे म्हणून आम्हाला हलाल मांसच दिले पाहिजे, त्याच पद्धतीने कापलेल्या प्राण्याचे मांस खाणार म्हणून आग्रह धरतात.
मल्हार प्रमाणपत्रासाठी मल्हार डॉट कॉम हे पोर्टल महाराष्ट्रातील झटका मांस दुकान मालकांसाठी सुरू करण्यात आले आहे. त्याअंतर्गत हिंदू मांस व्यापाऱ्यांना मल्हार प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यासाठी तुम्हाला MalharCertification.com या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल. येथे हिंदू व्यापाऱ्यांना नोंदणी करावी लागेल. त्यानंतर मल्हार प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
मांस उपलब्ध करून देतांना हिंदू धार्मिक परंपरेनुसार बकरी आणि मेंढीचे ताजे, स्वच्छ आणि इतर कोणत्याही प्राण्यांच्या मांसात मिसळलेले नसावे याची खात्री करणे हे यामागील उद्दिष्ट आहे. या अंतर्गत विकले जाणारे हे मांस केवळ हिंदू खाटीक समुदायाच्या विक्रेत्यांकडून उपलब्ध केलेले असेल. मल्हार वेबसाइटनुसार, मांस तयार करताना काटेकोर हिंदू धार्मिक पद्धतींचे पालन करणाऱ्या विक्रेत्यांना प्रोत्साहन दिले जाते. जेणेकरून ते हिंदू खाटीक समुदायाच्या परंपरांचे पालन करेल. बहुतेक हिंदू असे मानतात की, मांस सेवनाची झटका पद्धत ही नैतिक पद्धत आहे. कारण प्राण्याला दीर्घकाळ त्रास न घेता त्वरित मारले जाते.
हिंदूंमध्ये बळी देण्याची पद्धती ही त्या पशुला कमीत कमी वेदना होईल अशीच आहे. अर्थात त्या पशूचे मस्तक एका झटक्यात कापले जाते. मुस्लिमांमधील पद्धती वेगळी आहे, त्याला ते हलाल असे संबोधतात. ते लोक त्या पशुचा गळा कुराण मधील आयत उच्चारत चिरतात आणि त्यानंतर त्या प्राण्याच्या शरीरातील संपूर्ण रक्त वाहू दिले जाते. हे घडत असताना तो प्राणी आचके देतो , हात पाय झाडतो आणि प्रचंड वेदना सहन करत मृत्यूला समोरा जातो. ही पद्धत यातनामय क्रूर आणि अमानुष आहे असे काही लोकांचे मत आहे. या पद्धतीने जीव घेण्यालाच मराठी भाषेत हालहाल करून मारणे असे म्हटले जाते. तो हलाल या शब्दाचा अपभ्रंश असल्याचे सांगितले जाते.