Homeathon Expo Nashik
होमेथॉन एक्स्पोमधून 'हरित नाशिक'चा निर्धारpudhari photo

Homeathon Expo Nashik : होमेथॉन एक्स्पोमधून 'हरित नाशिक'चा निर्धार

१८ ते १९ डिसेंबरदरम्यान डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजन
Published on

नाशिक : नरेडको नाशिक आयोजित 'होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५' साठी डोंगरे वसतिगृह मैदान सज्ज झाले आहे. या गृहप्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, आकर्षक डोम्स उभारणीसह नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे स्टॉल्स आकार घेत आहेत. दि. १८ ते २१ डिसेंबर या चारदिवसीय प्रदर्शनात 'हरित नाशिक'चा निर्धार केला जाणार आहे.

नरेडको नाशिकच्या माध्यमातून सर्व बांधकाम व्यावसायिकांनी पर्यावरण संवर्धनाचा निर्धार केला आहे. महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत, प्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रत्येक नागरिकामागे एक रोपटे लावण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या चार दिवसांत जितके नागरिक प्रदर्शनाला भेट देतील, तितकी वृक्षलागवड नरेडकोच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

Homeathon Expo Nashik
Fake disability scam : जि. प. मधील आणखी दोघे बोगस दिव्यांग निलंबित

होमेथॉन प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर आणि नरेडको नाशिकचे सचिव शंतनू देशपांडे यांनी सांगितले की, रिअल इस्टेट विकासाबरोबरच पर्यावरणाची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. होमेथॉनच्या माध्यमातून नाशिकच्या प्रगतीबरोबरच हरित भविष्यासाठीही आम्ही कटिबद्ध आहोत. या प्रदर्शनाला नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून घरखरेदीदार, गुंतवणूकदार आणि रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित नागरिक उपस्थित राहणार असून, नाशिककरांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नरेडको नाशिक शाखेचे अध्यक्ष सुनील गवादे यांनी केले आहे.

प्रदर्शनाचे समन्वयक जयेश ठक्कर, सहसमन्वयक उदय शाह, मार्जियान पटेल, अभय नेरकर, चेअरमन अभय तातेड, सचिव शंतनू देशपांडे, खजिनदार भूषण महाजन, भाविक ठक्कर, पुरुषोत्तम देशपांडे, प्रशांत पाटील, हर्षल धांडे, प्रसन्न सायखेडकर, मुकुंद साबू, पंकज जाधव, ताराचंद गुप्ता प्रदर्शन यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.

ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स

ग्राहकांना अनेक आकर्षक संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ४.९९ टक्के गृहकर्ज दरासारखी विशेष ऑफर या एक्स्पोची प्रमुख वैशिष्ट्ये असणार आहेत. याबरोबरच एकाच छताखाली ५०० हून अधिक निवासी व व्यावसायिक प्रोजेक्ट्स पाहण्याची व तुलना करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. नाशिकसह महाराष्ट्रातील विविध भागांतील प्रोजेक्ट्सची माहिती या एक्स्पोमध्ये उपलब्ध असणार आहे. ग्राहकांना त्यांच्या बजेटनुसार आणि गरजेनुसार घर निवडणे सोपे होणार आहे.

Homeathon Expo Nashik
Industrial exhibition centre : प्रदर्शनी केंद्राचा संभ्रम कायम

नाशिकच्या विकासाचा नवा अध्याय

ग्राहकांना एकाच ठिकाणी घरखरेदीसाठी विविध पर्याय उपलब्ध करून देणे, पारदर्शक व्यवहारांना प्रोत्साहन देणे आणि नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्राला अधिक बळकटी देणे, हा या वर्षीच्या होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पोचा उद्देश असल्याचे सहसमन्वयक उदय शाह यांनी सांगितले. नाशिकच्या विकासाचा नवा अध्याय लिहिणाऱ्या या गृहप्रदर्शनाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. 'होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५' नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्राला नवी दिशा देईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news