Gram Panchayat Election : निफाडला 46 ग्रामपंचायतींसाठी नव्याने महिला सरपंच आरक्षण जाहीर

13 ग्रामपंचायतींसाठी 2021 मधील आरक्षण कायम ठेवण्यात आले
Sarpanch Reservation
सरपंच आरक्षण (File Photo)
Published on
Updated on

निफाड (नाशिक) : निफाड तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींसाठी महिला सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी बुधवारी (दि. 30) उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत बैठक पार पडली. या वेळी 46 ग्रामपंचायतींसाठी नव्याने महिला सरपंच आरक्षण जाहीर करण्यात आले असून, 13 ग्रामपंचायतींसाठी 2021 मधील आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे. या बैठकीस निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे, निवासी नायब तहसीलदार राहुल मुळे, ग्रामपंचायत महसूल सहाय्यक शरद घाटगे, सागर रोकडे आदी उपस्थित होते.

Sarpanch Reservation
Gram Panchayat Sarpanch | 88 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

या 13 ग्रामपंचायतींचे आरक्षण कायम

  • अनुसूचित जमाती : कानळद, कुंभारी, पचकेश्वर, पाचोरे खुर्द

  • नागरिकांचा मागास प्रवर्ग : कुंदेवाडी, सारोळे थडी, तामसवाडी, थेरगाव

  • सर्वसाधारण : नारायण टेंभी, सारोळे खुर्द, वेळापूर, कुरुडगाव, हनुमाननगर

Sarpanch Reservation
Nashik Gram Panchayat : पहिला निकाल हाती, चांदवड तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर

या ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

  • अनुसूचित जाती : दिक्षी, रुई (धानोरे), खडकमाळेगाव (खानगाव नजीक), ओणे

  • अनुसूचित जमाती : धारणगाव वीर, खेडे, नैताळे (रामपूर), दावचवाडी

  • नागरिकांचा मागास प्रवर्ग : भुसे, खानगाव थडी, चापडगाव, शिरवाडे वणी, बोकडदरे, चांदोरी (नागापूर), भरवस (मानोरी खुर्द), साकोरे मिग, थेटाळे, चाटोरी, गोंडेगाव, अंतरवेली

  • सर्वसाधारण : शिरसगाव, पिंपळगाव नजीक, लासलगाव, महाजनपूर, उगाव, वाहेगाव दहेगाव, गाजरवाडी, दारणासांगवी, पिंपळगाव निपाणी (सावळी), रौळस, बेहेड, रसलपूर, रामनगर, म्हाळसाकोरे, सायखेडा, करंजी खुर्द (ब्राह्मणवाडे), शिरवाडे वाकद, मुखेड, मांजरगाव, टाकळी विंचूर, ब्राह्मणगाव वनस, सोनेवाडी खुर्द, काथरगाव, तारुखेडले, कोटमगाव, वाकद.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news