

नांदगाव (नाशिक) : तालुक्यातील मार्च २०२५ ते ४ मार्च २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या एकूण ८८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोमवारी (दि. २८) तहसीलदार सुनील सौंदाणे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आले. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 6, अनुसूचित जमातीसाठी 12, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 24, तर सर्वसाधारणसाठी 46 ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत.
अनुसूचित जाती : वडाळी खु।।, नवसारी, गोंडेगाव, पानेवाडी, हिसवळ बु।।, भालूर
अनुसूचित जमाती : हिसवळ खु।।, बेजगाव, कन्ही, क्रांतिनगर, दहेगाव, चिंचविहीर, वंजारवाडी, भार्डी, जवळकी, टाकळी बु।।, गंगाधरी, शास्त्रीनगर.
नागरिकांचा मागास प्रवर्ग : पळाशी, मंगळणे, हिंगणदेहरे, जातेगाव, वाखारी, श्रीरामनगर, हिंगणवाडी, तळवाडे, मोहेगाव, धोटाणे बु।।, बाभूळवाडी, अनकवाडे, मांडवड, चांदोरा, धनेर, हिरेनगर, कसाबखेडा, माणिकपुंज, अस्तंगाव, पांझणदेव, मूळडोंगरी, बिरोळे, साकोरा, कासारी.
सर्वसाधारण : टाकळी खु।।, बाणगाव बु।।, बोराळे, खादगाव, जामदरी, दऱ्हेल, मल्हारवाडी, कुसुमतेल फुलेनगर, गिरणानगर, बोयेगाव, पिंपरखेड, धोटाने खु।।, नागापूर, लोढरे, लक्ष्मीनगर, ढेकू खु।।, मळगाव, वेहेळगाव, नवे पांझण, कोंढार, खिर्डी, सोयगाव, एकवई, बाणगाव खु।।, लोहशिंगवे, परधाडी, पिंप्रीहवेली, बोलठाण, न्यायडोंगरी, पिंप्राळे, भौरी, पोखरी, जळगाव खु।।, जळगाव बु।।, रोहिले बु।।, आमोदे, सावरगाव, सटाणे, मोरझर, तांदूळवाडी, रणखेडे, कळमदरी, वडाळी बु।।, नांदूर, माळेगाव (क).
सरपंच पदाच्या आरक्षणापैकी ५० टक्के आरक्षण महिलांकरिता राखीव असून, महिला सरपंच आरक्षण सोडत दि. ३० जुलै २०२५ रोजी मा. उपविभागीय अधिकारी येवला यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय नांदगाव येथे होऊन आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे.