Gold and Silver Market | सोने, चांदी दर घसरणीचा सिलसिला कायम

नाशिकच्या बाजारात सलग तिसऱ्या दिवशी दरात घसरण
Gold and Silver Market |
Gold and Silver Market | सोने, चांदी दर घसरणीचा सिलसिला कायम
Published on: 
Updated on: 

नाशिक : सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीचे सत्र शुक्रवारीही (दि. २०) कायम राहिले. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी नाशिक, जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्‍या दरात ६ हजार १८०, तर चांदीच्या दरात तब्‍बल ८ हजार ७६० रुपयांची घसरण झाली. यामुळे २४ कॅरेट सोन्याचा दर तोळ्‍याला १ लाख २७ हजार ७२० रुपये होता. तर, चांदीचा दर किलोला १ लाख ५९ हजार १३० रुपये राहिला.सोने-चांदीच्‍या दरात सलग घसरणीमुळे गुंतवणूकदार चिंतेत, तर इच्छुक ग्राहक खुशीत, असे चित्र आहे. गुरुवारी जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा दर १,३३,९०० रुपये तोळा होता. शुक्रवारी तो १,२७,७२० रुपयांवर आला.

एका दिवसात सोन्याच्या दरात ४.६ टक्‍के घसरण झाली. गुरुवारी प्रतिकिलो १,६७,८९० रुपये असलेली चांदी शुक्रवारी १,५९,१३० रुपयांवर आली. म्हणजेच एका दिवसात चांदी ८,७६० रुपयांनी स्वस्त झाली. चांदीच्या दरात सुमारे ५.२ टक्क्यांची घट झाली.

दर आणखी घसरण्‍याचा अंदाज

अमेरिकन डॉलरची मजबुती, अमेरिकेतील व्याज दरांबाबतची अनिश्चितता, रोख्यांवरील वाढता परतावा आणि जागतिक गुंतवणूकदारांची नफावसुली, यामुळे सोन्याच्या दरावर दबाव वाढला आहे. तर, चांदीला गुंतवणुकीसह औद्योगिक मागणीतील चढ-उतार मारक ठरत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींतील घसरण व रुपयाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य यानुसार देशांतर्गत दर आणखी घसरण्याचा अंदाज आहे.

तीन दिवसांत किती घसरण?

२४ कॅरेट सोने ८,०३० रुपये प्रति १० ग्रॅम

२२ कॅरेट सोने : ७,३९० रुपये प्रति १० ग्रॅम

चांदी : ११,६४० रुपये प्रतिकिलो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.