Girish Mahajan news: अपघातग्रस्त ट्रकमधून जखमींची सुटका करण्यासाठी गिरीश महाजन स्वतः उतरले मदतीला

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या ताफ्यासमोर पिंपळगाव परिसरात दोन ट्रकचा अपघात झाला.
Girish Mahajan
Girish MahajanFile Photo
Published on
Updated on

Girish Mahajan news

नाशिक : दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या ताफ्यासमोर पिंपळगाव परिसरात दोन ट्रकचा अपघात झाला. एका ट्रकचे अचानक टायर फुटल्याने तो नियंत्रणाबाहेर जाऊन दुसऱ्या ट्रकवर आदळला. या अपघातात ट्रकमध्ये काही जण अडकून पडल्याचे निदर्शनास येताच महाजन यांनी क्षणाचाही विलंब न करता आपला ताफा थांबवला आणि स्वतः घटनास्थळी धाव घेतली.

अपघातग्रस्त ट्रकमध्ये चालक, क्लिनरसह काही जण अडकले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत महाजन यांनी मदतकार्याला सुरुवात केली. स्वतः ट्रकवर चढून आत अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी त्यांनी मदत केली. यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांसह उपस्थित नागरिकांनीही बचावकार्यात हातभार लावला.

Girish Mahajan
Nashik Municipal Corporation | धूरफवारणीत हलगर्जीपणा भोवला! नाशिक महापालिकेची पेस्ट कंट्रोल ठेकेदारांवर 25 लाखांची दंडात्मक कारवाई

जखमींना बाहेर काढल्यानंतर त्यांना विलंब न करता वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी पालकमंत्र्यांनी तातडीने व्यवस्था केली. शासकीय वाहनातून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले. अपघातस्थळी उपस्थित असलेल्या प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. यावेळी आमदार गोकुळ गीते, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह प्रशासनातील अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

दुष्काळ पाहणीचा दौरा थांबवून माणुसकीला प्राधान्य

नाशिक जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री महाजन यांचा दौरा सुरू असताना हा अपघात झाला. शेतकरी आणि ग्रामीण भागातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी निघालेला हा दौरा काही काळ थांबवत त्यांनी प्रथम अपघातग्रस्तांच्या मदतीला प्राधान्य दिले. अपघातस्थळी केवळ सूचना देऊन न थांबता प्रत्यक्ष बचावकार्यात सहभागी होत जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. मंत्री महाजनांनी स्वतः ट्रकच्या केबिनमध्ये चढून अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.

यापूर्वीही अपघातग्रस्तांच्या मदतीला धाव

संकटाच्या प्रसंगी ताफा थांबवून मदत करण्याची महाजन यांची ही पहिलीच घटना नाही. १३ सप्टेंबर रोजी मुलुंड ब्रिजजवळ ट्रक उलटून झालेल्या अपघातावेळीही त्यांनी आपला ताफा थांबवून जखमींची विचारपूस केली होती आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यापूर्वी नाशिक दौऱ्यात रस्त्यावर अचानक प्रकृती बिघडलेल्या महिलेला मदत करण्यासाठी ताफा थांबविल्याची घटनाही समोर आली होती. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम, प्रशासकीय दौरे किंवा राजकीय कार्यक्रमांपेक्षा संकटात सापडलेल्या नागरिकांना तातडीने मदत मिळावी, याला ते प्राधान्य देत असल्याचे त्यांच्या अशा घटनांमधून दिसून येते.

“आधी जीव वाचवणे, बाकी सर्व नंतर …”

पिंपळगावजवळील या घटनेत दुष्काळ पाहणीचा दौरा सुरू असतानाही महाजन यांनी आपला ताफा थांबवून थेट अपघातस्थळी धाव घेतली. ट्रकमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी स्वतः मदत केली आणि जखमींना तातडीने उपचारासाठी पाठवले. त्यामुळे प्रशासनातील अधिकारी, कार्यकर्ते आणि उपस्थित नागरिकांनीही बचावकार्यात सहभाग घेतला. पद, प्रोटोकॉल आणि ताफा यापेक्षा एखाद्या संकटात सापडलेल्या माणसाचा जीव महत्त्वाचा असतो पिंपळगावजवळील अपघाताच्या प्रसंगी महाजन यांच्या कृतीतून हा मानवी दृष्टिकोन पुन्हा एकदा दिसून आला.

Girish Mahajan
Nashik Talathi Strike | नाशिकमध्ये तलाठ्यांच्या कामबंद आंदोलनावर अखेर तोडगा! 3 तलाठ्यांच्या निलंबनाला स्थगिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news