Girish Mahajan named Nashik guardian minister-सिंहस्थ पुस्तिकेवर गिरीश महाजनांचा 'पालकमंत्री' म्हणून उल्लेख

Girish Mahajan named Nashik guardian minister-नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत मोठा ट्विस्ट
Girish Mahajan
गिरीश महाजन (file photo)
Published on
Updated on

नाशिक : जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच आता या संपूर्ण प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या 'सिंहस्थ कुंभपर्व' माहिती पुस्तिकेवर भाजपचे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांचा थेट 'पालकमंत्री' असा उल्लेख करण्यात आल्याचे समोर आले आहे. या उल्लेखावरून आता विरोधकांच्या हाती महायुतीविरोधात टीकेचे नवे अस्त्र गवसले आहे.

Girish Mahajan
स्टारडम मोठे की समाज ? सामाजिक जबाबदारीची सीमारेषा कशी ठरवणार?

राज्य सरकार स्थापन झाल्यापासून रायगड आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे. या पदासाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांकडून जोरदार दावा केला जात आहे. विशेषतः पुढील वर्षी होणाऱ्या भव्य सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचे पालकमंत्रिपद अधिक प्रतिष्ठेचे ठरले आहे. सध्या गिरीश महाजन यांच्याकडे कुंभमेळामंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे. नाशिकमधील कुंभमेळ्याच्या नियोजनावरून आणि बैठकांमधील भाजपच्या वर्चस्वावरून मित्रपक्षांमध्ये आधीपासूनच अंतर्गत अस्वस्थता आहे.

कुंभमेळा कामांसाठी शहरात सुरू असलेले खोदकाम आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला होता. हीच संधी साधत नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी महापालिका प्रशासन तसेच महाजन यांच्या कारभारावर जाहीर निशाणा साधला होता.

Girish Mahajan
Sahebrao Datir attacked - प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे नेते साहेबराव दातीर यांच्यावर हल्ला

एकीकडे महायुतीत नाशिकच्या जागेवरून अंतर्गत धुसफूस सुरू

असतानाच, अधिकृत पुस्तिकेच्या मागील पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोंसोबत गिरीश महाजन यांच्या फोटोखाली 'पालकमंत्री आणि कुंभपर्वमंत्री' असा उल्लेख आढळलेला असल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

मंत्री महाजनांचा सावध पवित्रा

या सरकारी पुस्तिकेतील उल्लेखामुळे राजकीय वातावरण तापलेले असताना, दुसरीकडे मंत्री महाजन यांनी मात्र सावध आणि संयमी भूमिका घेतली आहे. "नाशिकला अधिकृत पालकमंत्री नसला, तरी काही बिघडत नाही. मी वैयक्तिकरीत्या सर्व कामांवर सतत लक्ष ठेवून आहे," अशी प्रतिक्रिया देत त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या एका उल्लेखामुळे महायुतीतील मित्रपक्षांमधील अस्वस्थता नक्कीच वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news