Girish Mahajan Statement Nashik | 'विश्वासघात आमच्या रक्तात नाही'

Girish Mahajan Statement Nashik |महाजन : पराभवाची चौकशी करू
Girish Mahajan Statement
Girish Mahajan Statement
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव आमच्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे. हा पराभव का, कशामुळे झाला, कोण आमच्या बाजूने उभे राहिले नाही, याबाबत चौकशी केली जाईल, असे भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

Girish Mahajan Statement
Goa Tourism sector - गोवा पर्यटन क्षेत्र धोक्यात

दराडे हे पराभवामुळे वेगळ्या मनःस्थितीत आहेत. विश्वासघात आमच्या रक्तात नाही, असे स्पष्टीकरणही महाजन यांनी दिले आहे. विधान परिषद निवडणुकीत राज्यभर महायुतीचे वर्चस्व प्रस्थापित झाले असले तरी नाशिक मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांचा विजय झाला असून, शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे पराभूत झाले आहेत. या पराभवानंतर नरेंद्र दराडे यांनी महायुतीवर स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे.

महायुतीने माझा विश्वासघात केला, असे ते म्हणाले. या आरोपांवर महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, दराडे यांच्या विजयासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. शेवटच्या दिवशी मी पूर्ण वेळ बूथवर होतो. तरीही मतदारांनी कौल आमच्या बाजूने दिला नाही. या ठिकाणी महायुतीची पावणे पाचशे मते होती. ६१९ पैकी जवळपास पावणे पाचशे मते महायुतीची होती. तरीसुद्धा इतकी कमी मते पडली. याचे कारण शोधण्याची गरज आहे. मी एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार आहे.

उदय सामंत यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. का झाले, कशामुळे झाले, कोण या ठिकाणी आमच्या बाजूने उभे राहिले नाही, हा खरा संशोधनाचा विषय आहे. याबाबत चौकशी केली जाईल, असे महाजन यांनी सांगितले. दराडेंच्या महायुतीवरील आरोपांवर ते पुढे म्हणाले, दराडे यांनी म्हटलंय की, महायुतीने विश्वासघात केला आणि त्यात त्यांनी माझेही नाव घेतले आहे. सध्या पराभवामुळे ते वेगळ्या मनःस्थितीत आहेत.

पण त्यांनाही कल्पना आहे, एकनाथ शिंदे, उदय सामंतांना, दादा भुसेंनाही माहीत आहे की, आम्ही त्या ठिकाणी किती प्रयत्न केले होते. मी असा माणूसच नाही, माझ्या ते रक्तातच नाही. ४० वर्षांच्या राजकारणात हा माझा कधीच स्वभाव राहिलेला नाही. पण दुर्दैवाने आमचा पराभव झाला आहे. याचा धक्का आम्हाला बसला आहे. मी आधीपासूनच म्हणत होतो की १७ पैकी १७ जागा आमच्याच येतील. विरोधी पक्षाला खातंसुद्धा उघडता येणार नाही. ते तंतोतंत खरे झालेले आहे. नाशिकची जागासुद्धा विरोधी पक्षाला मिळालेली नाही. दराडे यांनी महायुतीवर आरोप करणे चुकीचे आहे, असेही महाजन यांनी सांगितले.

Girish Mahajan Statement
Legislative Council Elections | युतीत आवाज कुणाचा?

महायुतीकडूनच विश्वासघातः नरेंद्र दराडे

निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आपल्या पराभवामागे महायुतीतीलच विश्वासघात कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. निकालानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी हा पराभव केवळ निवडणुकीतील पराभव नसून, आपल्यावरील विश्वासघाताचा परिणाम असल्याचे म्हटले. दराडे म्हणाले की, आपण महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलो होतो. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पाठबळ मिळेल, अशी अपेक्षा होती.

मात्र प्रत्यक्ष मतदानात अपेक्षित साथ मिळाली नाही. निकालातील मतांचे गणित पाहता महायुतीमध्येच कुठेतरी दगाफटका झाल्याचे स्पष्टपणे जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले. पराभवाचे विश्लेषण करताना दराडे यांनी, मतदारांनी दिलेला कौल मी स्वीकारतो. मात्र निवडणुकीत ज्या पद्धतीने घडामोडी झाल्या, त्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. महायुतीतील काही घटकांकडून सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे या मागील वास्तव समोर येणे आवश्यक आहे, या संपूर्ण प्रकरणाची माहिती आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news