Ganesh Murti Stalls | गणेश मूर्ती विक्रीसाठी 274 स्टॉल उभारणार

विभागीय कार्यालयांमध्ये 7 ऑगस्टला होणार लिलाव
नाशिक
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सार्वजनिक गणेश मंडळांसाठी ऑनलाइन परवानगी प्रक्रियेला सुरुवात केली आहे.Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सार्वजनिक गणेश मंडळांसाठी ऑनलाइन परवानगी प्रक्रियेला सुरुवात केली असून, येत्या ७ ऑगस्टला गणेशमूर्ती विक्री स्टॉल जागेची लिलावप्रक्रिया राबविली जाणार आहे. यंदा शहरातील २४ ठिकाणी तब्बल २७४ स्टॉल्स उभारले जाणार आहेत.

यंदा २७ ऑगस्टला लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. सार्वजनिक मंडळांकडून गणेश आरास केली जाते. यासाठी मंडप, कमानी उभारण्यासह विविध परवानग्यांकरिता महापालिकेने ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात केली आहे. त्यासाठी विभागीय कार्यालय स्तरांवर एक खिडकी योजना राबविली जात आहे, तर गणेश मूर्ती विक्रीसाठी येत्या ७ ऑगस्टला दुपारी २.३० वाजता सहाही विभागीय कार्यालयांच्या स्तरावर स्टॉल्सच्या जागांकरिता लिलाव केले जाणार आहेत. प्रथम लिलाव प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्यास लगेच दुसऱ्या दिवशी ८ ऑगस्ट रोजी २.३० वाजता विभागीय कार्यालयांमध्येच लिलाव घेण्यात येतील. यंदा सहाही विभागांमध्ये तब्बल २७४ गणेशमूर्ती स्टॉल्सची उभारणी केली जाणार आहे. यात सर्वाधिक १०५ स्टॉल्स नाशिकरोड विभागात उभारले जाणार आहेत.

नाशिक
POP Ganesh idol immersion ban : मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन करायचे कुठे?

प्रत्येक स्टॉल्ससाठी पाच हजार रुपये अनामत

गणेश मूर्ती विक्री स्टॉल्सच्या लिलावात भाग घेणाऱ्यांना प्रत्येक स्टॉलच्या जागेसाठी पाच हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. तसेच रहिवासी पुराव्यासह ओळखपत्राची (आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, वाहन परवाना, पॅनकार्ड, लाइटबिल, बँक पासबुक) छायांकित दोन साक्षांकित सादर करावी लागणार आहे.

नाशिक
Ganeshotsav POP Murti : पीओपी मूर्तींवर आधी ‘ना-ना’, मग ‘हो-हो’

विभागनिहाय स्टॉल्सची संख्या

विभाग - स्टॉल्सची संख्या

  • नाशिक पूर्व - १४

  • नाशिक पश्चिम - ५५

  • पंचवटी - ४८

  • सातपूर - ७

  • सिडको - ४५

  • नाशिकरोड - १०५

  • एकूण - २७४

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news