Ganesh Chaturthi : ‘श्रीं’च्या आगमनाला खड्ड्यांचे विघ्न नको!

Nashik News आयुक्तांचे आदेश : मिरवणूक मार्ग अतिक्रमणमुक्त करणार
 Nashik Ganeshotsav 2025
‘श्रीं’च्या आगमनाला खड्ड्यांचे विघ्न नको!Pudhari News Network
Published on
Updated on
Summary

ठळक मुद्दे

  • गणेश मंडळांना एक खिडकी योजनेअंतर्गत तातडीने परवानगी देण्याच्या सूचना

  • सार्वजनिक गणेश मंडळांच्या सूचना, तक्रारींची महापालिका आयुक्तांनी घेतली दखल

  • मिरवणूक मार्गावरील विद्युत तारा व केबल्स काढून टाकण्याचे आयुक्तांचे निर्देश

नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचना, तक्रारींची महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी गंभीर दखल घेतली असून, गणरायाच्या स्थापनेपूर्वी शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त, अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश संबंधित विभागप्रमुखांना दिले आहेत. मंडळांना एक खिडकी योजनेअंतर्गत तातडीने परवानगी देण्याच्या सूचनाही विभागीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

महापालिकेत नुकत्याच पार पडलेल्या खातेप्रमुखांच्या बैठकीत आयुक्तांनी आगामी गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. सार्वजनिक मंडळांना मागणीनुसार मंडप उभारणीसाठी एक खिडकीद्वारे तातडीने परवानगी द्यावी. या संदर्भातील अर्ज व परवानगीचा दैनंदिन आढावा घ्यावा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

शहरातील चौक, मुख्य रस्ते व बाजारपेठांतील खड्डे तातडीने बुजवावेत, रस्ते दुभाजक व वाहतूक बेटांची स्वच्छता करावी, पाणी तुंबून वाहतुकीला अडथळा होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना आयुक्तांनी दिली. विसर्जनासाठी मंडप व कृत्रिम कुंडाची व्यवस्था करावी. तसेच मिरवणूक मार्गावरील विद्युत तारा व केबल्स काढून टाकाव्यात. उत्सव काळात पथदीप सुरळीत सुरू राहतील यासाठी दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

 Nashik Ganeshotsav 2025
Ganeshotsav Celebration : नव्या संकल्पना, वाद्यांसह ढोल निनादणार!

परवाना नसलेले फलक हटविणार

शहरातील मुख्य रस्ते व बाजारपेठांवरील रस्ते, पदपथ येथील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. विनापरवाना लावलेले फलक, होर्डिंग्ज, झेंडे, पताका तत्काळ काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच वाहतूक बेट व रस्ते दुभाजकांवर जाहिरात फलक लावू नयेत, याची काटेकोर दक्षता घेण्याचे आदेशही दिले.

आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना...

  • मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे तातडीने हटवा.

  • वाहतूक बेट, रस्ते दुभाजकांवरील जाहिरात फलक हटवा.

  • संपूर्ण उत्सवकाळात पथदीप बंद राहणार नाही याची खबरदारी घ्या.

  • गणेश विसर्जनासाठी ठिकठिकाणी विसर्जन कुंड उभारणार.

  • कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट निर्मूलनाचे आदेश.

  • पाणीपुरवठा सुरळीत व मुबलक ठेवा.

  • मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, तक्रारी प्राप्त झाल्यात कारवाई करा.

  • विभागीय अधिकाऱ्यांनी दररोज पाहणी दौरा करावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news