fuel price hike | इंधन दरवाढीमुळे सिटीलिंकचा वाढला तोटा

तूर्त भाडेवाढ नाही; प्रवाशांना दिलासा
Petrol, Diesel prices hiked
Petrol, Diesel prices hikedPudhari
Published on
Updated on

नाशिक : डिझेलपाठोपाठ सीएनजीच्या दरातही मोठी वाढ झाल्याने सिटीलिंकचा तोटाही वाढला आहे. इंधन दरवाढीमुळे बस ऑपरेटर्स कंपन्यांना वाढीव दराने देयक अदा करावे लागणार असल्याने बस संचलनाचा खर्च वाढणार आहे. मात्र, तूर्त प्रवासी भाडेवाढीचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे सिटीलिंक प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे नाशिककरांना सध्या तरी दिलासा मिळाला आहे. महापालिकेच्या नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात सिटीलिंक कनेक्टिंग नाशिकच्या माध्यमातून शहरात ५० डिझेल, तर २०० सीएनजी इंधनावरील बसेस चालविल्या जातात.

सिटीलिक अल्पावधीतच नाशिककरांच्या पसंतीस उतरली आहे. मात्र, प्रवासी भाडेशुल्कातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत खर्च अधिक असल्याने सुरुवातीपासून सिटीलिंक तोट्यात आहे. सिटीलिंकला होणाऱ्या तोट्याची पूर्तता महापालिकेच्या निधीतून केली जात आहे. त्यातच आता सातत्याने होणारी इंधन दरवाढ सिटीलिंकच्या खर्चात वाढ करणारी पर्यायाने तोट्यात वाढ करणारी ठरली आहे. गत १५ मे पासून आतापर्यंत सीएनजीच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या १२ दिवसांत सीएनजीत प्रतिकिलो सहा रुपयांची वाढ नोंदविली गेली आहे. तर पेट्रोल-डिझेलच्या दरातही चार वेळा वाढ झाली आहे. डिझेलचे दर प्रतिलिटर आठ रुपयांनी महागले आहेत. याचा फटका सिटीलिंकला बसत आहे.

ऑपरेटरला द्यावी लागणार वाढ

ऑपरेटर्स कंपन्यांच्या माध्यमातून सिटीलिंकच्या बससेवेचे संचलन केले जात आहे. सद्यस्थितीत सीएनजी बसेसकरिता ६४ रुपये प्रतिकिलोमीटर, तर डिझेल बसेसकरिता ८३ रुपये प्रतिकिलोमीटर दराने ऑपरेटर्स कंपन्यांचे देयक सिटीलिंकमार्फत अदा केले जाते. गेल्या १२ दिवसांत सीएनजी, डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्याने ऑपरेटर्स कंपन्यांना वाढीव दराने देयक अदा करावे लागेल. त्यामुळे सिटीलिंकचा तोटा वाढला आहे.

सीएनजी, डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली असली तरी तूर्त सिटीलिंकच्या प्रवासी भाडेवाढीचा कोणताही प्रस्ताव नाही.

- विजयकुमार मुंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिटीलिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news