FDA Nashik Raids| नाशिकमध्ये FDA ची मोठी कारवाई! कोल्ड स्टोरेजमधून 39 लाखांचा बनावट अन्नसाठा जप्त

FDA Nashik Raids| 6,457 किलो फ्रोझन कस्टर्ड ॲपल पल्प, मॅंगो पल्प व क्रीमचा समावेश
FDA Nashik Raids
FDA Nashik Raids
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अन्न व औषध प्रशासनाकडून राबविल्या जात असलेल्या राज्यव्यापी विशेष तपासणी मोहिमेंतर्गत निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील आर्या कोल्ड स्टोरेज अँड एक्सपोर्ट येथे तपासणी करण्यात आली. या कारवाईत ६,४५७ किलो अन्नपदार्थांचा ३९ लाख १८ हजार ५२० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.

FDA Nashik Raids
NDCC Bank | नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माजी संचालकांची पुन्हा फेरचौकशी; सहकार विभागाचे मोठे आदेश

तपासणीदरम्यान फ्रोझन कस्टर्ड ॲपल पल्प, मॅंगो पल्प आणि क्रीम या अन्नपदार्थांचा साठा आढळून आला. जप्त केलेल्या साठ्यात २,९९६ किलो फ्रोझन कस्टर्ड ॲपल पल्प, १,७८० किलो मॅंगो पल्प आणि १,६८१ किलो क्रीमचा समावेश आहे.

या अन्नपदार्थांबाबत कमी दर्जाचा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. कारवाईत अन्नसुरक्षा अधिकारी सुहास मंडलिक आणि अमित रासकर यांनी सहभाग घेतला. सहायक आयुक्त दिनेश तांबोळी आणि सहआयुक्त मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

FDA Nashik Raids
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेत स्थायी समितीचा मोठा उद्रेक; 650 कोटींची वाढीव कामे कागदावरच!

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर तपासणी

सणासुदीच्या काळात मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, मसाले, फळांचे पल्प तसेच अन्य खाद्यपदार्थांच्या मागणीत वाढ होते. या पार्श्वभूमीवर अन्नसुरक्षा व मानके अधिनियम तसेच त्या अंतर्गत नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडून तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

लेबल आवश्यक, माहितीचा अभाव

तपासणीदरम्यान संबंधित अन्नपदार्थांच्या लेबलवर 'यूज बाय डेट', पोषणमूल्यांची माहिती, पॅकिंगची तारीख तसेच भारतीय अन्नसुरक्षा व मानक प्राधिकरणाचा परवाना क्रमांक आढळला नसल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा विश्लेषण अहवाल आल्यानंतर त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news