FDA Nashik | FDA ची धडक कारवाई! नाशिक विभागात 10 दिवसांत 5 कोटींचा भेसळयुक्त अन्नपदार्थांचा साठा जप्त

FDA Nashik | धडक मोहीम : तूप, लोणी, मिठाई, तेलासह अन्नपदार्थांचा समावेश
FDA
FDAPudhari File Photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांची वाढणारी मागणी लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने नाशिक विभागात धडक तपासणी मोहीम सुरू केली आहे. गेल्या दहा दिवसांत विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेल्या ३६ कारवायांमध्ये तब्बल ५ कोटी ४० लाख १६ हजार ६२१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तूप, लोणी, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, मिठाई, मसाले आणि अन्य अन्नपदार्थांचा यामध्ये समावेश आहे.

FDA
Nashik Simhastha Kumbh Mela | नाशिक कुंभमेळ्याचे जागतिक ब्रँडिंग होणार! प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांचे महत्त्वाचे निर्देश

सणासुदीच्या काळात मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, मसाले, फराळाचे पदार्थ, ड्रायफ्रूट्स आदींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष तपासणी व कारवाई मोहीम राबवण्यात येत आहे.

ही मोहीम अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे आणि सहआयुक्त (अन्न) मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तपासणीदरम्यान अन्नपदार्थांचे नमुने घेणे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे तसेच अन्नसुरक्षा व मानदे कायद्यानुसार कारवाई केली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध कायद्यातील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक मोठी कारवाई

अहिल्यानगर येथील एमआयडीसीतील अरिहंत कोल्ड स्टोरेजमधून 'मधुरमा क्रीमी डिलाइट' या पाश्चराइज्ड कुकिंग बटरचा ७५ हजार ३५६.८ किलो साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत तब्बल ३ कोटी ९५ लाख ६२ हजार ३२० रुपये आहे.

निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील आर्या कोल्ड स्टोरेज अँड एक्स्पोर्ट्स येथून फ्रोजन कस्टर्ड ॲपल पल्प, मॅंगो पल्प आणि क्रीम असा एकूण ६ हजार ४५७ किलो आणि ३९ लाख १८ हजार ५२० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. ११ सप्टेंबर रोजी पहाटे द्वारका, नाशिक येथे दोन खासगी बसमधून वाहतूक करण्यात येत असलेला २१५५ किलो वजनाचा आणि ५ लाख ५८ हजार २६७ रुपये किमतीचा स्पेशल स्वीट बर्फीचा साठाही जप्त करण्यात आला.

FDA
Shalarth ID scam | नाशिक विभागातील 841 शालार्थ आयडी बनावट! जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक 638 प्रकरणांचा फटका

नाशिकमध्येही कारवाई

शहरातील रविवार कारंजा येथील विजया एंटरप्रायझेसमधून इंटर एस्टरिफाइड व्हेज फॅटचा २९८.४ किलो साठा, किंमत १ लाख २९ हजार २९८ रुपये जप्त करण्यात आला. पंचवटीतील प्रकाश एंटरप्रायझेसमधून दोन प्रकारच्या रिफाइंड सोयाबीन तेलाचा ७४७.९ किलो साठा, किंमत १ लाख १८ हजार ५८८ रुपये जप्त करण्यात आला. रविवार कारंजा येथील अन्य एका कारवाईत इलायची, सोप आणि तीळ असा ५४.५ किलो साठा, किंमत २१ हजार ८०० रुपये, तर जेल रोडवरील श्री महावीर सुपर मार्केटमधून गूळ आणि तुपाचा साठा जप्त करण्यात आला.

तूप, मिठाईवरही नजर

जळगाव, धुळे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतही तूप, मिठाई, सुपारी, पामोलीन तेल आदींच्या साठ्यावर कारवाई करण्यात आली. पाचोरा येथून क्रीम व तुपाचा ५९३.४ किलो साठा, धुळे येथून गायी-म्हशीच्या तुपाचा ४६३.४ किलो साठा, तर अहिल्यानगरमधील सावेडी येथून ३०० किलो तुपाचा साठा जप्त करण्यात आला. श्रीरामपूर येथून २३० किलो गायीचे तूप, जळगाव येथून चंदन स्वीट सुपारी, संगमनेर येथून ५८३ लिटर आरबीडी पामोलीन तेल, तर जळगावमधून विविध प्रकारच्या मिठाईचा ३७० किलो साठा जप्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news