Fruit Crop Insurance Scheme | फळपीक विम्यासाठी 'फार्मर आयडी' बंधनकारक! कृषी अधिकारी रवींद्र माने यांची महत्त्वाची माहिती

Fruit Crop Insurance Scheme | हवामान आधारित फळपीक विमा योजना सन २०२६ अंतर्गत जिल्ह्यासाठी आंबिया बहारात काजू, केळी, द्राक्ष, आंबा, स्ट्रॉबेरी, डाळिंब व मोसंबी या फळ पिकांचा समावेश केला आहे.
Crop insurance scheme farmers
Crop insurance scheme farmers
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

हवामान आधारित फळपीक विमा योजना सन २०२६ अंतर्गत जिल्ह्यासाठी आंबिया बहारात काजू, केळी, द्राक्ष, आंबा, स्ट्रॉबेरी, डाळिंब व मोसंबी या फळ पिकांचा समावेश केला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक असून अॅग्रिस्टॅकअंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) बंधनकारक केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली आहे.

Crop insurance scheme farmers
Nashik Fodder Crisis | नाशिक जिल्ह्यावर चाराटंचाईचे सावट! खरीप कडबा आणि पेंढ्याचे उत्पादन घटण्याची भीती

योजनेत सहभागासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक असून अर्जासोबत आधार कार्ड, ७/१२ उतारा, फळबागेचा अक्षांश-रेखांशासह फोटो आणि बँक पासबुकची प्रत जोडणे गरजेचे आहे. तसेच 'ई-पीक पाहणी'मध्ये संबंधित पिकाची नोंद असणे अनिवार्य आहे; नोंदीत विसंगती आढळल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.

Crop insurance scheme farmers
Nashik Market Committee | नाशिक बाजार समितीवर 37 वर्षांनंतर अशासकीय प्रशासक मंडळ; अध्यक्षपदी गणेश गिते यांची निवड!

शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी काढल्यानंतरच या योजनेत सहभाग नोंदवावा. शेतकऱ्यांनी विहित मुदतीपूर्वी अॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक काढून फळपीक विमा योजनेत सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी pmfby.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा वा नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माने यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news