Nashik Police | नाशिकमध्ये बनावट पोलिसांचा धुमाकूळ! दोन ज्येष्ठ नागरिकांना गंडवून 7 लाखांचे सोने लांबवले

Nashik Police | सात लाखांचे सोने लांबपास ; नाशिकरोड, अंबड पोलिसांत गुन्हा
Fake Police
Fake PolicePudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पोलिस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांना गाठत त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेण्याच्या दोन घटना नाशिकरोड आणि अंबड पोलिस ठाणे हद्दीत घडल्या आहेत. या दोन्ही घटनांमध्ये भामट्यांनी एकाच पद्धतीने नागरिकांना हेरून त्यांच्या दागिन्यांवर डल्ला मारला.

Fake Police
Nashik SIR Voter | नाशिक जिल्ह्यातील 7 लाखांहून अधिक मतदारांना नोटीस; 'एसआयआर' पडताळणी प्रक्रियेला वेग!

दोन्ही घटनांमध्ये सुमारे सात लाख रुपयांचा सोन्याचा ऐवज लांबपास झाला आहे.
नाशिकरोडच्या स्नेहमंदिर सोसायटी परिसरातील सुराणा हॉस्पिटलजवळ दिलीप कचरादास कलेश्चा (६८, बांधकाम व्यावसायिक, नाशिकरोड) यांना दोन अनोळखी व्यक्तींनी पोलिस असल्याचे भासवून गाठले. कलेश्चा हे घरी जात असताना एका व्यक्तीने त्यांना आवाज देत परिसरात चेनस्नॅचिंगच्या घटना सुरू असल्याचे सांगितले.

खबरदारी म्हणून गळ्यातील दागिने काढून कागदात ठेवण्यास सांगितले. त्यानंतर हातचलाखीने दोन तोळ्यांची सोन्याची चेन आणि हिरेजडित सोन्याची अंगठी काढून घेण्यात आली. कागद बदलून त्यात मातीचा गोळा ठेवण्यात आला. काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेले दोघे पसार झाले. नाशिकरोड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Fake Police
Tribal Gen Z Nashik | आदिवासी 'जेन झी'चा नाशिक ते मुंबई लाँग मार्च; आदिवासी विकासमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

कागद बदलण्याच्या बहाण्याने मागच्याने लांबविली पोत..!

अंबडच्या अश्विननगर रिक्षा स्टँड परिसरातही अशीच घटना घडली. सीता शंतकांत मिस्त्री (६३, गृहिणी, अश्विननगर, सिडको) यांना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी थांबवून आपण पोलिस असल्याचे सांगितले.

परिसरात खून झाल्याचे सांगत तपास सुरू असल्याचे भासवून गळ्यातील सोन्याची पोत काढून कागदात ठेवण्यास सांगितले. कागद बदलण्याच्या बहाण्याने मागील व्यक्तीने पोत काढून घेतली. सुमारे एक लाख रुपये किमतीची ही पोत होती. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नाली पल्लांडे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news