Viresh Borkar Hunger Strike | गोव्यात 'टीसीपी' फाईल्स गायब! आंदोलनानंतर 10 फाईल्स चोरीला गेल्याचा खळबळजनक दावा

Viresh Borkar Hunger Strike | मुख्यमंत्री : मंत्र्यांच्या निवासस्थानावर गेलेल्या आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करणार
Viresh Borkar Hunger Strike
Viresh Borkar Hunger Strike
Published on
Updated on

पुढारी वृत्तसेवा पणजी : सांत आंद्रेचे आमदार विरेश बोरकर आंदोलनादरम्यान नगर व शहर यांच्या नियोजन खात्याच्या कार्यालयातून १० फाईल्स गायब झाल्या आहेत. याप्रकरणी बुधवारी (दि. २५) पणजी पोलिस स्थानकात अज्ञातांविरुद्ध पणजीचे नक्षर नियोजक विनोदकुमार चंद्रा यांनी तक्रार दाखल केली आहे.

Viresh Borkar Hunger Strike
Goa Tourism Fraud | सावधान! गोव्यात 'टुरिस्ट गाईड' बनून पर्यटकांची लूट; सासष्टी परिसरात भामट्यांचा सुळसुळाट

टीसीपी कार्यालयात रात्री उशिरापर्यत आंदोलनकर्ते उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी कार्यालयात आल्यानंतर त्यातील काही फाईल्स गायब झाल्याचे लक्षात आल्यावर त्याची तपासणी केल्यावर १० फाईल्स गायब झाल्याचे निष्पन्न झाले. याव्यतिरिक्त टीसीपी मंत्र्यांच्या निवासस्थानावर चाल करून गेलेल्या आंदोलकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

सात आंद्रे मतदार संघातील ३९ (अ) कलमाअंतर्गत मंजूर करण्यात आलेले सर्व जमीन रुपांतरणाचे प्रस्ताव स्थगित ठेवण्यास सरकार तयार असून अधिकृत पत्रही तयार करण्यात आले आहे, या प्रक्रियेसाठी ८ दिवस लागतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. नगरनियोजन मंत्री विश्वजित राणे यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते.

दरम्यान, कलम ३९ (अ) पूर्ण रद्द करण्याच्या मागणीसाठी पणजीतील आझाद मैदानावर उपोषण करणारे आमदार वीरेश बोरकर यांनी जोपर्यंत ३९ (अ) पूर्ण रद्द होत नाही; तोपर्यंत आपले उपोषण आपण मागे घेणार नाही, असा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे हा गुंता वाढलेला असून आझाद मैदानावरील आंदोलन बुधवारीही चालूच राहिले.

सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी त्यांच्या मतदारसंघातील पाळे शिरदोन येथे नगरनियोजन कायद्याच्या ३९ (अ) अंतर्गत केलेले भू संपादन रद्द करण्याची मागणी घेऊन आंदोलन सुरू केले होते. त्यानुसार सांत आंद्रेतील ३९ (अ) अंतर्गत असलेले भू संपादन रद्द करण्याची ती मागणी मान्य करण्यास सरकार तयार झाले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी (दि. २५) याबाबत माहिती दिली. दरम्यान, बुधवारी सायंकाळी लोकांना आमदार बोरकर यांना भेटण्यास मज्जाव करण्यात आला. ते झोपूनच होते. त्यांच्यासोबत तुषार गावस हेही उपोषण करत आहे. तर तेथे जमलेल्या महिलांनी नगर नियोजन खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांच्या विरोधात घोषणा देणे सुरुच ठेवले होते.

उपोषण मागे घ्या; पण...

मंगळवारी रात्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आझाद मैदानात येऊन उपोषण करणारे आमदार वीरेश बोरकर यांची भेट घेतली होती व त्यांना तब्येत बिघडण्यापूर्वी उपोषण मागे घ्या, तुमच्या मागणीचा विचार करतो. विधानसभा अधिवेशनात चर्चा करू, असे आश्वासन दिले होते. मात्र, आमदार बोरकर यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची सूचना फेटाळत उपोषण चालूच ठेवले होते.

सभागृहात उत्तरे मिळत नाहीत :

बोरकर व्हिलचेअरवरून बीएसीच्या बैठकीला उपस्थिती लावल्यानंतर आमदार बोरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बोरकर म्हणाले की, विधानसभा सभागृहात टीसीपी संदर्भातील आपल्या प्रश्नांना योग्य ती उत्तरे मिळत नाहीत, याची तक्रार आपण बैठकीत डॉ. गणेश गावकर आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली. त्यावर येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व उत्तरे देण्याच्या सूचना त्यांनी टीसीपीच्या सचिवांना केलेल्या आहेत.

केजरीवाल यांचा उपोषणास पाठिंबा

दरम्यान, गोव्यात पक्ष कार्यासाठी आलेले दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही ३९ (ए) दुरुस्ती रह करावी, यासाठी आमदार वीरेश चोरकर यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.

Viresh Borkar Hunger Strike
Vishwajit Rane Health Ministry | सावधान! गोव्यातील 10 टक्के जनता नैराश्याच्या छायेत; 1000 लोकांमागे 100 जण डिप्रेशनमध्ये!

आमदार बोरकरांना कार्यालयातून ओढून बाहेर काढणे भोवले

पणजी पोलिस निरीक्षकासह तिघांची बदली पणजी : पुढारी वृत्तसेवा सांत आंद्रेचे रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाचे आमदार विरेश बोरकर हे पाटो पणजी येथील टीसीपी कार्यालयात गेले असता त्यांच्याशी गैरवर्तणूक करून कार्यालयातून ओढून बाहेर काढल्याप्रकरणी पणजी पोलिस निरीक्षकांसह दोन पोलिस कॉन्स्टेबल्सची राखीव पोलिस दलात (जीआरपी) बदली करण्यात आली आहे.

या कारवाईने समाधान न झाल्याने त्यांच्या निलंबनाची मागणी करण्यात येत आहे. या तडकाफडकी बदलीनंतर पणजी पोलिस स्थानकाचा अतिरिक्त ताबा आगशीचे निरीक्षक अनंत गावकर यांच्याकडे देण्यात आला आहे. आमदार विरेश बोरकर यांनी ३९ (अ) कलम रह करण्यासाठी आझाद मैदानावर उपोषण सुरू केल्यानंतर गेल्या सोमवारी पणजीतील महा आंदोलनात पणजी पोलिस निरीक्षकांना सेवेतून निलंबित करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, सरकारने नाममात्र कारवाई केल्याने आंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news