

नाशिक : गेल्या विधानसभेत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवत विरोधकांना विरोधी पक्षनेते पद मिळविण्याचीदेखील सोय ठेवली नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतदेखील जिल्हा नगरपालिका, महापालिकेवर महायुतीचाच झेंडा परिषद, फडकवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना केले. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या स्वबळाच्या पर्यायाच्या चर्चाना तूर्त पूर्णविराम मिळाला आहे.
सातपूर, त्र्यंबक रोड येथील डेमोक्रॉसी बँक्वेट हॉल येथे आयोजित बूथप्रमुख कार्यशाळा व प्रमुख पदाधिकारी बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी, मुख्यमंत्री काळात केलेल्या विविध योजना तसेच महायुती म्हणून केलेली कामे घरोघरी पोहोचविण्याचेही कार्यकर्त्यांना आवाहनही केले. तसेच महायुतीला गालबोट लागणार नाही, अशी विधाने करू नका. जागा वाटपात शिवसेनेचा सन्मान केला जाईल. त्यासाठी एकनाथ शिंदे खंबीर आहे, असे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लोकसभेत विरोधकांनी फेक नरेटिव्ह पसरविला. मात्र, विधानसभेत आम्ही विरोधकांचा डाव यशस्वी होऊ दिला नाही. लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत शिक्षण, महिलांना एसटी तिकिटात ५० टक्के सवलत अशा योजना आणल्या. लोकांनीदेखील या योजनांचे स्वागत करीत, आमच्यावर विश्वास दाखवत ऐतिहासिक २३२ जागा महायुतीच्या पदरात टाकल्या. त्यामुळे या योजना आम्ही कधीही बंद करणार नाही. आपला पक्ष सामान्य कार्यकर्त्यांचा आहे. येथे मालक विरुद्ध कार्यकर्ता, असा संघर्ष नाही. त्यामुळे तुम्ही एकनाथ शिंदे बनून काम करा. रिझल्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही. विधानसभा निवडणुकीत अटीतटीच्या जागा जिंकल्या. त्यामुळे कठीण निवडणूक सोपी करू. त्यासाठी प्रत्येकाने मतदारयाद्यांचा सूक्ष्म अभ्यास करा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. आपली सर्वसामान्यांशी बांधिलकी आहे. ती जपायची आहे. बूथप्रमुख, पदाधिकारी रस्त्यावर उतरल्यास विरोधकांना पळताभुई कमी होईल, असेही ते म्हणाले.
मी जेव्हा मुख्यमंत्री झालो, तेव्हा रोज हे सरकार पडणार, घटनाबाह्य मुख्यमंत्री असे सांगितले जात होते. एक शेतकरीपुत्र मुख्यमंत्री झाल्याची त्यांना पोटदुखी होती. सरकार पडले नाही तर, दुसऱ्यांदा सरकार मोठा मताधिक्याने आले. कारण लोक काम करणाऱ्यांच्या पाठीशी राहतात, घरी बसणाऱ्याच्या नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, आमदार किशोर दराडे, नरेंद्र दराडे, माजी खासदार हेमंत गोडसे, विजय करंजकर, अजय बोरस्ते, विलास शिंदे, प्रवीण तिदमे, सूर्यकांत लवटे आदी उपस्थित होते.
नुकसान मोठे, मदतही मोठी
अतिवृष्टीमुळे राज्यातील ६० लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले 3 शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेतली. तसेच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या माध्यमातून पंतप्रधानांकडेदे मदतीची मागणी केली. नुकसान मोठे असल्याने, मदतही मोठी देण्य आमचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
इच्छुकांचे शक्तिप्रदर्शन
आगामी निवडणुकीसाठी इच्छुकांनी यावेळी चांगलेच शक्तिप्रदर्शन वे स्वतःची छबी असलेले कटआउट बैठकीत झळकविले. पक्षाच्या मु नेत्याची आपल्यावर नजर जावी, यासाठी इच्छुकांकडून सुरू असले आटापिटा बघण्यासारखा होता.
कांदा उत्पादकांना न्याय देणार
नाशिकमध्ये मोठे उद्योग आणले. ईव्ही हब म्हणून पुढे येत आहे. कांदा उत्पादकांना न्याय द्यायचा आहे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
बूथप्रमुखाला विसरू नका
स्थानिक स्वराज्य संस्था या पक्षाचा पाया असतात. तर या निवडणुकांमध्ये बूथप्रमुखाची भूमिका मोलाची असते. मात्र, निवडणुका आल्या की, बूथप्रमुखाची आठवण होते. असे होता कामा नये. बूथप्रमुखांना महत्त्व देऊन त्याच्या पाठीशी ताकद उभी करा. कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या निवडणुकांसाठी प्रयत्न केले, आता नेत्यांनी त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
अधिकाऱ्याला निलंबित करणार
मुंबई महापालिकेत १५-२० वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबई खड्डेमुक्त नव्हती. मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले. नाशिकलादेखील खड्डेमुक्त केल्याशिवाय राहणार नाही. खड्ड्यास कारणीभूत अधिकाऱ्याचे निलंबन करण्यासाठी आयुक्तांशी चर्चा करणार. कामात जो अधिकारी हलगर्जीपणा करणार त्याची हकालपट्टी करायलाच हवी, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.