e-KYC for free ration scheme India
e-KYC for free ration scheme IndiaPudhari Canva Photo

E-KYC Ration Card | दिंडोरीत ई-केवायसीकडें दुर्लक्ष करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांचे रेशन बंद होणार

एक सप्टेंबरपासून धान्यपुरवठा होणार बंद
Published on
Summary
  • दिंडोरीत 39 हजार 369 शिधापत्रिकांची ई-केवायसी झालेली नाही

  • ई-केवायसी न झाल्याने रेशन येत्या 1 सप्टेंबरपासून बंद होणार

  • उर्वरित शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी नोंदणी पूर्ण केली जाईल.

दिंडोरी (नाशिक) : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करण्यासाठी दि. 31 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत तालुक्यातील एकुण 2 लाख 43 हजार 985 शिधापत्रिकाधारकांपैकी 2 लाख 4 हजार 616 शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. तालुक्यातील 39 हजार 369 शिधापत्रिकांची ई-केवायसी न झाल्याने त्यांचे रेशन येत्या 1 सप्टेंबरपासून बंद होणार आहे.

केंद्र सरकारकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत अंत्योदय व प्राधान्य रेशनकार्ड धारक कुटुंबांना महिन्याकाठी मोफत धान्य वितरित केले जाते. या योजनेत सुसूत्रता आणताना समाजातील गरजूंना धान्याचा लाभ मिळावा यासाठी ई-केवायसी नोंदणी बंधनकारक केली आहे. दि. 31 जुलैपर्यंत सर्व ई- केवायसी नोंदणी पूर्ण करण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या, त्या धर्तीवर धान्य दुकानात काम सुरू होते, त्यानुसार शिधापत्रिकाधारकांना वेळोवेळी आवाहन करूनही ई-केवायसी नोंदणी करण्याकडे हजारो शिधापत्रिकाधारकांनी दुर्लक्ष केले. परिणामी, त्यांना आता धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे.

e-KYC for free ration scheme India
Ration Card E-KYC | 'ई - केवायसी'त नाशिक शहर अव्वल

तालुक्यातील 84 टक्के शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी नोंदणी पूर्ण केली असून, 16 टक्के शिधापत्रिका धारकांची ई-केवायसी नोंदणी बाकी आहे. त्यांना येत्या 1 सप्टेंबरपासून धान्यपुरवठा बंद होईल. शासनाने दिलेली मुदत दि. 31 जुलैला संपली असून, शासनाने पुन्हा मुदत वाढवून दिली तर उर्वरित शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी नोंदणी पूर्ण केली जाईल.

अक्षय लोहारकर, पुरवठा निरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news