E Crop Survey : ई-पीक पाहणी न केल्यास शासकीय सहाय्यास मुकावे लागणार

शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यास अडचण येणार
e-crop survey
ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या पिकांची होणार पहाणीpudhari photo
Published on
Updated on

येवला (नाशिक) : तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-पीक पाहणी नोंदणी केलेली नाही, अशा शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यास अडचण येणार आहे. शेतकऱ्यांनी तत्काळ ई-पीक पाहणी नोंदवावी, असे आवाहन तहसीलदार आबा महाजन यांनी केले आहे.

e-crop survey
E Crop Survey Offline Registration: ई-पीक पाहणी आता ऑफलाइन! 15 जानेवारीपर्यंत नोंदणीची संधी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पीकपेरा

'माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पीकपेरा' या संकल्पनेनुसार ई-पीक पाहणी ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी प्ले स्टोअरवर जाऊन ही ई-पीक पाहणी ॲप डाउनलोड करावे. त्यानंतर ई-पीक पाहणी ॲप वापरण्यासाठी लागणारी माहिती तेथे दिलेली असेल. या ॲपद्वारे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची माहिती स्वतः भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची नोंद न केल्यास शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना, अनुदान वाटप, आपत्तीसंबंधी मिळणाऱ्या अर्थसहाय्याला मुकावे लागण्याची वेळ येऊ शकते. सरकारकडून मिळणाऱ्या मदतीसह पीकविमा, पीककर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे ई-पीक पाहणी गरजेची आहे. यासाठी काही अडचण असल्यास ग्राममहसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधत २४ जानेवारीपर्यंत ई- पीक पाहणी पूर्ण करावी, असे आवाहन केले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news