Nashik Kumbh Mela 2026 | सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक सज्ज! द्वारका ते नाशिकरोड रस्ता आता होणार 'दहा पदरी'

Nashik Kumbh Mela 2026 | ३५ जागामालकांना मनपाच्या नोटिसा; रस्ता क्षेत्राचे डिमार्केशन
Nashik Kumbh Mela 2026
Nashik Kumbh Mela 2026
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजनासाठी द्वारका ते नाशिकरोड या नाशिक-पुणे रस्त्याचे दहा पदरीकरण केले जाणार आहे. या रस्ता रुंदीकरणासाठी टीडीआरद्वारे भूसंपादनाचा निर्णय महापालिकेने घेतला असून, रस्ता क्षेत्राचे डिमार्केशन करत ३५ जागामालकांना भूसंपादनाच्या नोटिसा बजावल्या जात आहेत.

Nashik Kumbh Mela 2026
Tiger Estimation 2026 | राज्यात गोव्याच्या जंगलात वाघांचा मागोवा! मार्चपासून सुरू होणार तीन महिन्यांची 'महाव्याघ्र गणना'

नाशिक शहरातील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या द्वारका चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी तब्बल तीनशे कोटी रुपये खर्च करून अंडरपास तयार केला जात आहे. या कामाला सुरुवात झाली असून, चौकातील वाहतूक अन्य मागनि वळविण्यात आली आहे. तीन महिने काम सुरू राहणार असल्याने या भागातील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे.

या चौकातील वाहतूक कोंडीवर उपाय शोधताना भविष्यातील गरज आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात वाहनांची वाढणारी गर्दी लक्षात घेता महापालिकेच्या बांधकाम विभागाने एकूण २७६ कोटी रुपयांच्या खर्चातून द्वारका ते नाशिकरोड रस्ता दहा पदरी करण्याचा प्रस्ताव न्हाईला सादर केला आहे. न्हाईने त्यास हिरवा कंदील देत हा रस्ता महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर रस्ता रुंदीकरणाच्या कामाला वेग देणे गरजेचे असल्यामुळे महापालिकेने रुंदीकरणासाठी आवश्यक रस्त्याच्या डाव्या बाजूकडील क्षेत्राचे डिमार्केशन करत भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. मौजे नाशिक शिवारातील स.नं. ८४७/१/१-१/२/१/१ नगररचना योजना क्रमांक २ पैकी मधील ४५ मीटर रुंद विकास योजना रस्त्याने डाव्या बाजूने बाधित होत आहे.

या बाधित क्षेत्राकरिता एकीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०२० मधील विनयम क्रमांक ११.२ नुसार हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) / संलग्न उर्वरित जागेत चटई क्षेत्र निर्देशांकाच्या मोबदल्यात बाधित क्षेत्र मनपाच्या ताब्यात देण्यात यावे, अशा आशयाच्या नोटिसा मनपाकडून संबंधित जागामालक तसेच शासकीय यंत्रणांना बजावल्या आहेत.

Nashik Kumbh Mela 2026
Goa Casino Protest | मांडवीत नवा कॅसिनो नकोच! माजी न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांचा कॅसिनोविरोधी चळवळीला पाठिंबा

वास्तुविशारदांमार्फत प्रस्ताव

जागामालकांना जमिनीच्या मोबदल्यात टीडीआर मिळविण्यासाठी वास्तुविशारदांमार्फत मनपास प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. एकीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील तरतुदीनुसार आपल्या प्रस्तावावर नियमोचित निर्णय घेण्यात येईल, असे महापालिकेने जागामालकांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news