Nashik Ten-Lane Road |द्वारका - नाशिकरोडदरम्यान दहापदरीकरणाचा मार्ग मोकळा

१६ निविदाधारक पात्र : केंद्राच्या आस्थापनांच्या जागा हस्तांतरणाचे आव्हान
Highway
HighwayPudhari
Published on
Updated on

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर द्वारका ते नाशिकरोड या ६.४ किलोमीटर मार्गाच्या दहापदरीकरणाला अखेर गती मिळणार आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने २२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, निविदा प्रक्रियेत १६ ठेकेदार पात्र ठरले आहेत. पुढील दहा दिवसांत कार्यारंभ आदेश देण्याची प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र, या मार्गावरील केंद्र सरकारच्या विविध आस्थापनांच्या जागांचे अद्याप हस्तांतरण झालेले नसल्याने भूसंपादनाचा अडथळा कायम आहे.

Highway
Nashik -शेतातील माती ते 'के. एल. राहुल'च्या कौतुकाची थाप

द्वारका ते नाशिकरोडदरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने काही वर्षांपूर्वी दत्तमंदिर ते द्वारका या मार्गावर उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानंतर मेट्रो निओचा प्रस्ताव पुढे आल्याने डबलडेकर उड्डाणपुलाची संकल्पना मांडण्यात आली. मात्र, आर्टिलरी सेंटर, गांधीनगर प्रेस यांसह केंद्र सरकारच्या विविध आस्थापनांच्या परवानग्यांमुळे हा प्रकल्प रखडला. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उड्डाणपुलाऐवजी या मार्गाचे थेट रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव पुढे आला.

Highway
Nashik Missing Girl Found | सिटीलिंक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हरवलेली चिमुकली आई-वडिलांच्या कुशीत

सुरुवातीला महापालिकेच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भूसंपादनासह संपूर्ण प्रक्रिया महापालिकेकडून करण्याचे नियोजन होते. मात्र, महापालिकेने तीन वेळा निविदा काढूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने घेतली. नुकत्याच झालेल्या निविदा प्रक्रियेत १६ निविदाधारक पात्र ठरले आहेत.

२२ वरून ४५ मीटर रुंद रस्ता

१ सध्या द्वारका-नाशिकरोड मार्गाची रुंदी सुमारे २२ मीटर आहे. त्यात आणखी २३ मीटरची भर घालून रस्ता तब्बल ४५ मीटर रुंद केला जाणार आहे. हा दहापदरी मार्ग असून, त्यात दोन सर्व्हिस रोडचा समावेश असेल. या कामात नंदिनी नदीवरील पुलांचेही रुंदीकरण करण्यात येणार आहे.

संरक्षक भिंतींची गरज

२ रस्ता रुंदीकरणाच्या मार्गात केंद्र सरकारच्या विविध आस्थापनांच्या मालमत्तांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीतील निवासी भागाचाही समावेश आहे. जागा हस्तांतरणासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, जागा ताब्यात मिळाल्यानंतरही संबंधित आस्थापनांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंती उभाराव्या लागणार आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष रस्ता रुंदीकरणाच्या कामाला विलंब होण्याची शक्यता आहे.

वाहतूक एकेरी; अवजड वाहनांना पर्यायी मार्ग

रुंदीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर द्वारका ते नाशिकरोडदरम्यान वाहतूक एकेरी करावी लागणार आहे. अवजड वाहने जेलरोड तसेच जय भवानी रोडमार्गे वळविण्याचे नियोजन आहे. एकेरी मार्गावरून सिटीलिक बसेस, चारचाकी आणि दुचाकी वाहनांना वाहतुकीची मुभा राहणार आहे. मात्र, काम सुरू झाल्यानंतर या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असून, पर्यायी कॉलनी रस्त्यांवरील वाहतुकीचा ताणही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news