CM Devendra Fadnavis | नाशिकमध्ये रंगणार 'दुष्काळ निर्मूलन जागर'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महामेळावा

CM Devendra Fadnavis | 10 हजार सरपंच, ग्रामसेवक, लोकप्रतिनिधींची उपस्थिती, दुष्काळाचा सामना अन् पाण्याचे शाश्वत नियोजन!
Devendra Fadanvis
Devendra FadanvisPudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे काटेकोर नियोजन, भूजल संवर्धन आणि गावांच्या शाश्वत विकासासाठी रविवारी (दि. ११) नाशिक येथील मोदी ग्राउंडवर संवाद मेळावा आयोजित केला आहे. ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या पुढाकाराने होणाऱ्या या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील १० हजार सरपंच, ग्रामसेवक आणि लोकप्रतिनिधी एकत्र येऊन 'दुष्काळ निर्मूलन जागर' करणार आहेत.

Devendra Fadanvis
Nashik Dam Water Level | नाशिक जिल्ह्यातील 26 धरणांचे दरवाजे बंद! नदीपात्रातील विसर्गाला अखेर पूर्णविराम

मेळाव्यात दुष्काळाच्या संकटावर केवळ तात्पुरते उपाय न शोधता गावागावांत 'वॉटर बजेट' तयार करणे, पावसाच्या पाण्याचा थेंब अन् थेंब साठविणे आणि भूजल पातळी वाढविण्यासाठी दीर्घकालीन कृती आराखडा तयार करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. या सोहळ्यामध्ये 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६' मधील उत्कृष्ट काम करणाऱ्या सरपंचांचा गौरव व बक्षीस वितरण होईल. तसेच अभियानाच्या पुढील टप्प्याचा म्हणजे 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० (२०२६-२७)'चा प्रारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

"दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन हा मेळावा अत्यंत साध्या पद्धतीने आणि कमीत कमी खर्चात केला जाणार आहे. ग्रामपातळीवरील लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांचा थेट सहभाग घेऊन पाणी व्यवस्थापन आणि गावांच्या विकासासाठी भविष्यातील उपाययोजनांवर विचारमंथन केले जाईल."

— जयकुमार गोरे, ग्रामविकासमंत्री

Devendra Fadanvis
Nashik Fodder Crisis | नाशिक जिल्ह्यावर चाराटंचाईचे सावट! खरीप कडबा आणि पेंढ्याचे उत्पादन घटण्याची भीती

या विषयांवर होणार चर्चा:

  • वॉटर बजेट व जलनियोजन

  • भूजल संवर्धन व पातळी वाढविणे

  • जलसंधारणाचे उपक्रम

  • दुष्काळ निवारण व चारा व्यवस्थापन

  • लोकजागृती व स्थानिक उपाय

  • गावाचा शाश्वत विकास आराखडा

मंत्री गोरेंकडून जागेची पाहणी:

ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी मंगळवारी (दि. ६) मोदी ग्राउंडवर मेळावा तयारीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे आदी उपस्थित होते. उपस्थितांसाठी पार्किंग, बैठकव्यवस्था व अन्य नियोजन वेळेत आणि नेटके पूर्ण करण्याचे आदेश मंत्री गोरे यांनी प्रशासनाला यावेळी दिले. कार्यक्रमाच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत सर्व व्यवस्था योग्य पद्धतीने आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news