Drone Didi medical services training - दुर्गम भागात वैद्यकीय सेवेसाठी 'ड्रोन दीदीं'ना प्रशिक्षण

मुंबई आयआयटीच्या प्रशिक्षकांकडून सुरगाण्यातील स्थानिकांना ड्रोन संचालनाचे धडे
नाशिक : दुर्गम भागात औषधांचा पुरवठा करण्यासाठी स्थानिकांना प्रशिक्षण देताना आयआयटी मुंबईचे प्रशिक्षक व आरोग्य विभागाचे पथक
नाशिक : दुर्गम भागात औषधांचा पुरवठा करण्यासाठी स्थानिकांना प्रशिक्षण देताना आयआयटी मुंबईचे प्रशिक्षक व आरोग्य विभागाचे पथक
Published on
Updated on

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील दुर्गम आदिवासी गावांसाठी आपात्कालीन परिस्थितीत औषधांचा व अत्यावश्यक सेवांचा पुरवठा करण्यासाठी आता 'ड्रोन दीदी' सज्ज होत आहेत. यासाठी मुंबई आयआयटीच्या तज्ज्ञांकडून स्थानिक महिलांनाच शिक्षण दिले जात असून, ही यंत्रणा स्थानिक महिलांमार्फतच चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्यातील आदिवासी भागात वेळेत वैद्यकीय सेवा पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ड्रोनद्वारे औषध पुरवठा करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. डोंगरी भागातील वाहतुकीच्या अडचणी, अतिवृष्टीत रस्ते खचणे किंवा नद्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटतो. अशा वेळी रुग्णांना औषधे आणि वैद्यकीय साहित्य वेळेवर मिळत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी ड्रोनच्या माध्यमातून थेट आरोग्य केंद्रांपर्यंत औषधे पोहोचविण्यात येणार आहेत.

या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत सुरगाण्यामध्ये मुंबईच्या आयआयटी संस्थेकडून महिलांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. संस्थेच्या तज्ज्ञांकडून ड्रोन हाताळणी, उड्डाण, औषधांची सुरक्षित वाहतूक आणि आपत्कालीन परिस्थितीत त्याचा वापर याचे सखोल प्रशिक्षण दिले जात आहे. यामुळे आरोग्यसेवा गतिमान होईल. त्याबरोबरच स्थानिक युवक युवतींना कौशल्य आणि रोजगाराच्या संधीदेखील उपलब्ध होणार आहेत.

नाशिक : दुर्गम भागात औषधांचा पुरवठा करण्यासाठी स्थानिकांना प्रशिक्षण देताना आयआयटी मुंबईचे प्रशिक्षक व आरोग्य विभागाचे पथक
Nashik Mhasrul encroachment dispute: अतिक्रमण कारवाईवरून म्हसरूळमध्ये राडा

सुरगाण्यात हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर जिल्ह्यातील इतर दुर्गम भागात हा प्रयोग राबवला जाईल. ड्रोन तंत्रज्ञानामुळे तासाभरात पोहोचणारी मदत आता काही मिनिटांत पोहोचू शकेल. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर उपचार मिळणार आहे. 'ड्रोन दीदी' हा केवळ तंत्रज्ञानाचा भाग नसून, तो एक आरोग्य क्रांतीचा चेहरा ठरणार आहे.

- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी

नाशिक : दुर्गम भागात औषधांचा पुरवठा करण्यासाठी स्थानिकांना प्रशिक्षण देताना आयआयटी मुंबईचे प्रशिक्षक व आरोग्य विभागाचे पथक
Tribal students protest nutrition GR |जीआरची होळी करीत आयुक्तालयावर धडक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news