Fake Murder Call | पत्नीचा खून झाल्याचा 112 वर फोन; पोलिस घटनास्थळी पोहोचताच समोर आले वेगळेच सत्य!

Fake Murder Call | पत्नीचा खून झाल्याची खोटी व धक्कादायक माहिती डायल ११२ या आपत्कालीन क्रमांकावर देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी दिंडोरी पोलिस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
Police
PolicePudhari
Published on: 
Updated on: 

दिंडोरी

पत्नीचा खून झाल्याची खोटी व धक्कादायक माहिती डायल ११२ या आपत्कालीन क्रमांकावर देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी दिंडोरी पोलिस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी संबंधितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, ही घटना शनिवार (दि. २१) सकाळी उघडकीस आली.

Police
Nashik Trimbakeshwar Road Traffic Diversion| नाशिक - त्र्यंबकेश्वर मार्गात चार दिवसांसाठी बदल

उमराळे बु. दूरक्षेत्र येथे हवालदार दशरथ साबळे व हवालदार मोरे हे डायल ११२ वर कर्तव्यावर असताना शनिवारी सकाळी ७.२० ला बोराचा पाडा येथे महिलेचा खून झाल्याचा कॉल आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ कॉलरच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला.

त्यावेळी त्याने पत्नी गंगुबाई पुंडलिक डाबल हिचा विळवंडी शिवारात खून झाल्याचे सांगितले. यामुळे पोलिस पथक तातडीने विळवंडीकडे रवाना झाले आणि सरपंच विष्णू वाघेरे यांनाही घटनास्थळी पाचारण केले. घटनास्थळी पोलिसांनी चौकशी केली असता, कॉल करणाऱ्याने त्याचे नाव पुंडलिक काशिनाथ डाबल (३८, रा. विळवंडी, ता. दिंडोरी) असे सांगितले.

Police
Nashik Kumbh Mela 2027 | नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याआधी मोठी मागणी! साधुग्राममधील कोट्यवधींची जागा आखाड्यांना हवी मोफत

मित्र रामदास सुखदेव मांडे (रा. सोनगाव, ता. दिंडोरी) याचा मोबाइल घेऊन त्याने हा कॉल केल्याचे निष्पन्न झाले. तसेच किरकोळ घरगुती भांडणानंतर पत्नी मुलांसह मामाच्या गावी निघून गेल्याचे त्याने कबूल केले. सरपंच व साक्षीदारांच्या उपस्थितीत खातरजमा केल्यानंतर गंगुबाई व तिची मुले ही तिचे मामा रमेश पानडगळे (रा. कचरपाडा, ता. त्र्यंबकेश्वर) यांच्याकडे सुखरूप असल्याचे स्पष्ट झाले.

केवळ पोलिसांना त्रास देण्याच्या उद्देशाने आपत्कालीन सेवेचा दुरुपयोग केल्याप्रकरणी हवालदार साबळे यांच्या फिर्यादीवरून पुंडलिक डाबलवर दखलपात्र गुन्हा नोंदवला असून, तपासासाठी त्याला ताब्यात घेतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.