Dindori Accident Case | दिंडोरी अपघातातील मृतांच्या वारसांना राज्य सरकारचा आधार; मुख्यमंत्री सहायता निधीतून 45 लाखांची मदत

Dindori Accident Case | दिंडोरी तालुक्यातील शिवाजीनगर परिसरात कार अपघातात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या ९ जणांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मंजूर करण्यात आली.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दिंडोरी तालुक्यातील शिवाजीनगर परिसरात कार अपघातात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या 9 जणांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मंजूर करण्यात आली.

Devendra Fadanvis
Nashik MNC Case SIT | नाशिक MNC कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक ॲक्शन मोडमध्ये, 'एसआयटी' स्थापन

प्रत्येक कुटुंबास ५ लाख रुपये याप्रमाणे एकूण ४५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख डॉ. चैतन्य बैरागी यांनी दिली आहे.

या दुर्घटनेत दिंडोरी तालुक्यातील इंदोरे येथील सुनील दरगोडे (३५), रेश्मा दरगोडे (३३), आर्या दरगोडे (३५), मृदुल दरगोडे (१५), श्रेयस दरगोडे (१२), श्रद्धा दरगोडे (१०), श्रावणी दरगोडे (११), गुणवती दरगोडे (९) आणि आयुषी दरगोडे (१३) यांचा समावेश आहे.

Devendra Fadanvis
Forced Conversion Allegations | धक्कादायक खुलासा! कंपनीतील पुरुषाचेही जबरदस्तीने धर्मांतर; नाव बदलून धार्मिक चौकटीत ओढले

मदतीची रक्कम तहसीलदार, दिंडोरी यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, दिंडोरी शाखेतील खात्यात वर्ग करण्यात येणार असून, संबंधित कुटुंबीयांच्या बँक खात्यात ती जमा करण्याबाबत बँकेस निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news