Nashik News | खासगी बसमधून बांगलादेशींची थेट महाराष्ट्रात एन्ट्री? आमदार देवयानी फरांदे यांच्या आरोपाने खळबळ

Nashik News | बांगलादेशच्या सीमेपर्यंत प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसेसमधून बांगलादेशी महाराष्ट्रात आल्याचा गंभीर आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी विधिमंडळात केली आहे.
Electric Bus Contract
Electric Bus (File Photo)
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बांगलादेशच्या सीमेपर्यंत प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसेसमधून बांगलादेशी महाराष्ट्रात आल्याचा गंभीर आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी विधिमंडळात केली आहे.

Electric Bus Contract
Nashik Bribe News | महिला सरपंचासह पती लाच घेताना रंगेहात ताब्यात

खासगी बसेसमधून होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीवर निर्बंध घालण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणीदेखील आ. फरांदे यांनी केली आहे. राज्यात खासगी बसेसच्या अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचा मुद्दा आ. फरांदे यांनी विधानसभेत उपस्थित केला.

महामार्गावर बस व ट्रक वाहतूक नियमांचे पालन न करता एकाच लेनमध्ये न चालविल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, अपघातांची शक्यता वाढत आहे. याकडे आरटीओ विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

बस व ट्रक यांनी नियमानुसार निश्चित लेनमध्येच प्रवास करणे बंधनकारक करण्यात यावे तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच काही खासगी बसेस एकाच चेसिस नंबर व ऑल इंडिया परमिटचा वापर करून इतर अनेक बसेस चालवत असल्याचे गंभीर प्रकार निदर्शनास आले आहेत.

एका चेसिस नंबरवर चार-पाच बसेस धावत असल्याची बाबही समोर आली आहे. या बसेस बांगलादेश सीमारेषेपर्यंत प्रवास करत असून, तेथून बांगलादेशी नागरिकांना नाशिक तसेच महाराष्ट्रात आणले जात असल्याचेही त्यांनी सभागृहात नमूद केले.

Electric Bus Contract
Life Inside Prison | भिंतीआडचा दिनक्रम, ताटातील शिस्त आणि नियमांची काटेकोर रेषा

या सर्व प्रकारांची सखोल चौकशी करून संबंधित बसेसवर तत्काळ कारवाई करण्यात यावी तसेच अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर नियंत्रण आणावे, अशी ठाम भूमिका आ. फरांदे यांनी मांडली. यावर उत्तर देताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी अशा बसेसची तत्काळ चौकशी करून नियमभंग आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news