Nashik Bribe News | महिला सरपंचासह पती लाच घेताना रंगेहात ताब्यात

ग्रामपंचायतीच्या अविश्वास ठराव प्रकरणात १५ हजार रुपयांची लाच स्वीकारली
Nashik Bribe Case
Nashik Bribe News | महिला सरपंचासह पती लाच घेताना रंगेहात ताब्यात
Published on
Updated on

नाशिक : रासेगाव व देहरेवाडी (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील ग्रामपंचायतीच्या अविश्वास ठराव प्रकरणात १५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सरपंच मंदा विठ्ठल बेडकुळे (वय ३५) व त्यांचे पती विठ्ठल पांडुरंग बेडकुळे (वय ३९) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ व ७अ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ला.प्र.), नाशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे रासेगाव व देहरेवाडी गावचे उपसरपंच असून त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी आरोपींनी लाचेची मागणी केली होती. सुरुवातीला ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यापैकी १५ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करण्यात आले.

Nashik Bribe Case
Nashik Bribe Case : दोन लाखांची लाच स्वीकारणाऱ्या दोन उपनिरीक्षकांसह चौघांना अटक

तक्रारदारांनी याबाबत ला.प्र. विभागाकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. पंचासमक्ष तक्रारदारांनी १५ हजार रुपयांची रक्कम दिली असता, त्यापैकी १४ हजार रुपये सरपंच श्रीमती मंदा विठ्ठल बेडकुळे यांनी तर १ हजार रुपये त्यांचे पती श्री. विठ्ठल पांडुरंग बेडकुळे यांनी स्वीकारले. लाच स्वीकारताच सापळा पथकाने दोघांनाही रंगेहात पकडले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी (ला.प्र. विभाग, नाशिक) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. सापळा पथकामध्ये पोलीस हवालदार विनोद चौधरी व पोलीस कॉन्स्टेबल अनिल गांगोडे यांचा सहभाग होता. या कारवाईस पोलीस अधीक्षक श्री भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व अपर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे यांनी मार्गदर्शन केले. . लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, शासकीय कामासाठी कोणीही लोकसेवक लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ विभागाशी संपर्क साधावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news