Sarvapitri Amavasya Ramkund Nashik | सर्वपित्री अमावस्येला पंचवटीतील रामकुंड परिसरात भाविकांची तुडुंब गर्दी; शनीअमावस्येचा दुर्मिळ योग

Sarvapitri Amavasya Ramkund Nashik | गंगाघाटावरील विकासकामांमुळे पाण्याचा अभाव; वाहतूक कोंडीने भाविक त्रस्त
Sarvapitri Amavasya Ramkund Nashik
Sarvapitri Amavasya Ramkund Nashik
Published on: 
Updated on: 

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

पितृपक्षातील सर्वपित्री अमावस्या यावर्षी शनीअमावस्याचा दुर्मिळ योग जुळून आल्यामुळे पंचवटीतील रामकुंडावर पूर्वजांच्या पूजनासाठी आणि पिंडदान करण्यासाठी भाविकांची गर्दी लोटली होती. मात्र, गोदाघाटावर सुरू असलेली विकासकामे आणि रामकुंड तसेच गांधी तलाव कोरडाच असल्यामुळे भाविकांची स्नानाची पंचाईत झाली. त्याचच पाणीटंचाई आणि वाहतूक कोंडीमुळे भाविकांना नाहक त्रासाचा सामना करावा लागला.

Sarvapitri Amavasya Ramkund Nashik
Ganesh Immersion Procession Route | नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग बदलणार; पंचवटी कारंज्यावरून नवा रूट प्रस्तावित

शनिवारी (दि. १०) सर्वपित्री अमावस्येनिमित्त राजभरातून हजारो भाविकांनी सकाळीच पंचवटीतील रामकुंडावर हजेरी लावली. या दिवशी पिंडदान, मुंडन विधी आणि काकस्पर्शासाठी घास ठेवण्याला विशेष धार्मिक महत्त्व असते. मात्र, रामकुंड आणि गांधी तलाव पूर्णपणे कोरडे पडल्यामुळे भाविकांना स्नानासाठी हुळकर पुलाखाली जावे लागले. पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली.

मुंडनासाठी आवश्यक असलेल्या पाण्यासाठी भाविकांना पिण्याच्या बाटल्यांचा वापर करावा लागला. रामकुंड परिसरात गोदाघाटावर सुरू असलेल्या विकासकामामुळे मुख्य घाटावर पिंडाची पूजा मांडणे अशक्य झाले होते. परिणामी, भाविकांनी रस्त्याच्या कडेला आणि उपलब्ध होतील, त्या जागेवर पूजा मांडली होती.

Sarvapitri Amavasya Ramkund Nashik
Mega Block | शनिवारी रेल्वे प्रवाशांचे हाल! आटगाव स्थानकाजवळ मेगाब्लॉकमुळे मनमाड-मुंबई 'पंचवटी एक्स्प्रेस' रद्द

पूजेनंतर काकस्पर्शासाठी घास ठेवण्यासाठी पंचवटी अमरधाममागील भिंतीजवळ मोठी गर्दी झाली होती. दाट झाडीच्या भागात कावळ्यांची संख्या अधिक होती. सर्वपित्री अमावस्येबरोबरच शनीअमावस्या आल्यामुळे शनिमंदिरातही दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. भाविकांनी शनीदेवाचा तेलाचा अभिषेक व रुईच्या पानांचा हार अर्पण केला. धार्मिक परंपरेनुसार काळे तीळ, उडीद, गूळ, मीठ, छत्री, चप्पल आणि वस्त्रांचे दान करत पुण्यसंचय केला.

वाहतूक कोंडीचा विळखा:

भाविकांची वाढलेली गर्दी आणि वाहन पार्किंगची योग्य व्यवस्था नसल्यामुळे सकाळपासूनच रामकुंड परिसर वाहतूक कोंडी झाली होती. गोरी पटांगण आणि म्हसोबा पटांगण वाहनांची गर्दी झाल्यामुळे वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाकडून उत्तम नियोजन करणे गरजेचे होते, अशी प्रतिक्रिया त्रस्त भाविकांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news