Devendra Fadnavis : भोंदू खरात प्रकरणाची ‌‘ईडी‌’ चौकशी होणार

मुख्यमंत्री फडणवीस; सरकार करणार मालमत्ता जप्त, सीडीआर कसा लीक झाला याच्याही मुळाशी जाणार
Devendra Fadnavis
Devendra FadnavisPudhari
Published on
Updated on

नाशिक : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता समोर आल्या असून, त्याच्या संपत्तीची आणि गैरव्यवहाराची ईडीकडून चौकशी केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केली. खरातने गैरमार्गाने प्राप्त केलेल्या जमिनी व मालमत्ता जप्त केल्या जातील, असे स्पष्ट करून या प्रकरणातील सीडीआर कसा लीक झाला याचाही छडा लावला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अखिल भारतीय संत समितीतर्फे आयोजित राष्ट्रीय बैठकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस नाशिकमध्ये आले असता ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ईडीने यासंदर्भात प्राथमिक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईअंती गैरमार्गाने प्राप्त जमिनी वा मालमत्ता निष्पन्न झाल्यानंतर त्या सरकारदरबारी जप्त केल्या जातील. खरातची मालमत्ता, त्याचे गैरव्यवहार, महिलांवरील अत्याचार या सर्व प्रकरणांचा सखोल तपास करून त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आतापर्यंत त्याच्यावर 12 गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच रोज नवीन माहिती समोर येत असून याबाबतची भरपूर माहिती एसआयटीकडे आहे. एखाद्या व्यक्तीचा सीडीआर प्राप्त करण्याचा कोणासही अधिकार नाही. तो केवळ तपास यंत्रणेलाच आहे. त्यामुळे अंजली दमानिया यांना प्राप्त झालेला सीडीआर कशा पद्धतीने लीक झाला, तो कोणी केला याची चौकशी राज्य सरकारतर्फे केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दमानियांना कागदपत्रे पुरवणाऱ्या अज्ञाताचा शोध घ्या ः उदय सामंत

अंजली दमानिया यांच्याकडे अशोक खरात प्रकरणातील सीडीआर पोहोचला असता तर त्यांची पूर्ण कॉपी आली असती. एका हॉटेलच्या लेटर हेडवर काही गोष्टी इंग्रजीमध्ये लिहिलेल्या आहेत. अज्ञात व्यक्तीने हे आपल्याला दिले असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे. मात्र, यामुळे एकनाथ शिंदेंचे नेतृत्व कमकुवत होणार नाही. याप्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी असल्याचे मंत्री सामंत यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news