Nashik Dengue Cases | "नाशिकमध्ये डेंग्यूचा उद्रेक!; 22 दिवसांत तब्बल 21 नवे रुग्ण, आरोग्य यंत्रणा सतर्क"

Nashik Dengue Cases | नाशिकमध्ये डेंग्यू रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. जुलै महिन्याच्या गेल्या २२ दिवसांतच डेंग्यूचे २१ नवे रुग्ण आढळल्याने डेंग्यू रुग्णसंख्येचा एकूण आकडा ४४ वर पोहोचला आहे.
Dengue outbreak risk |
Dengue outbreak risk | ‘अल निनो’मुळे आता ‘डेंग्यू’च्या डंखांचाही ताप वाढणार!File Photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकमध्ये डेंग्यू रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. जुलै महिन्याच्या गेल्या २२ दिवसांतच डेंग्यूचे २१ नवे रुग्ण आढळल्याने डेंग्यू रुग्णसंख्येचा एकूण आकडा ४४ वर पोहोचला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य-वैद्यकीय विभागाने डेंग्यू प्रतिबंधात्मक धूर-जंतूनाशक फवारणीला वेग देतानाच जनजागृती मोहिमेला बळ देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Dengue outbreak risk |
MSRTC Bus Leaking |"एसटीतही छत्री उघडून प्रवास करण्याची वेळ!नाशिक-करंजुल बसमधील दयनीय अवस्थेवर प्रवाशांचा संताप"

शहरात दरवर्षी पावसाळा आला की डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव होतो. एडीस इजिप्ती नावाचे मादी डास डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत ठरतात. या डासांचा प्रादुर्भाव स्वच्छ पाण्यात होतो.

पावसाळ्यात घराच्या परिसरातील भंगार साहित्य, नारळाच्या करवंट्या, निकामी टायर्स, शोभेच्या झाडांच्या कुंड्यांमध्ये पावसाचे पाणी साचते. यात या डासांची पैदास होते. त्यामुळे पावसाळ्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्याचे नेहमीच दिसते.

यंदाही नाशिककरांना डेंग्यूचा डंख लागला आहे. जून महिन्यात डेंग्यूसदृश आजाराचे १६९ रुग्ण आढळले होते. रुग्णांचे रक्तनमुने शासकीय प्रयोगशाळेत तपासले असता त्यापैकी ८ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाली.

शहरात ठिकठिकाणी पावसाची डबकी साचली. त्यात डेंग्यू प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या डासांची पैदास झाली. त्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत गेला. जुलैच्या १ ते २२ तारखेदरम्यान डेंग्यूसदृश आजाराचे २६० रुग्ण आढळले होते. रुग्णांचे रक्तनमुने शासकीय प्रयोगशाळेत तपासले असता २१ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. रुग्णसंख्येचा हा आकडा गतमहिन्याच्या तुलनेत अडीच पटीने अधिक आहे.

Dengue outbreak risk |
ZP Scholarship Exam | "गतवर्षी केवळ 23 % निकाल! चौथी अन् सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी नाशिक जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय"

डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण

  • १६९ - जून महिन्यात

  • २६० - जुलै महिन्यात

डेंग्यू रुग्णसंख्येचा आकडा गेला ४४ वर

जानेवारी २०२६ मध्ये डेंग्यूचे सहा रुग्ण आढळले होते. त्यानंतर फेब्रुवारीत ३, मार्चमध्ये २, एप्रिल १, मे ३ तर जून महिन्यात डेंग्यूचे ८ रुग्ण आढळले होते. जुलैच्या गत २२ दिवसांत या आजाराचे २१ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे डेंग्यू रुग्णसंख्येचा एकूण आकडा ४४ वर पोहोचला आहे. चार जणांना चिकनगुनिया झाल्याचे समोर आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news