Ashok Kharat case STICE reputation controversy | 'स्टाइस'च्या प्रतिष्ठेला धक्का; आवारेंचा पाठिंबा काढून घ्या

विरोधी संचालकांची मागणी; सत्ताधारी संचालकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
Ashok Kharat case
STICE reputation controversypudhari photo
Published on
Updated on

STICE reputation controversy

सिन्नर : सिन्नर तालुका सहकारी औद्योगिक वसाहत (स्टाइस) संस्थेचे अध्यक्ष नामकर्ण आवारे आणि कथित आर्थिक गैरप्रकार प्रकरणातील आरोपी भोंदू अशोक खरात यांच्यातील संबंधांमुळे 'स्टाइस'ची प्रतिमा आणि विश्वासार्हता मलिन झाल्याचा आरोप करीत विरोधी संचालकांनी सत्ताधारी संचालकांवर जोरदार टीका केली आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून माजी चेअरमन अविनाश तांबे यांच्यासह विरोधी संचालकांनी सत्ताधाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.

Ashok Kharat case
Nashik smart lighting complaints-स्मार्ट लायटिंग' विषयी महिनाभरात ४,२७६ तक्रारी

माजी चेअरमन तांबे यांच्यासह पंडित लोंढे, सुधाताई माळोदे आणि बाबासाहेब दळवी यांनी संयुक्त प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, गेल्या दीड महिन्यापासून भोंदू अशोक खरातच्या कथित गुन्हेगारी कृत्यांमुळे तसेच अध्यक्ष नामकर्ण आवारे यांच्याशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे 'स्टाइस'ची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. या सर्व घडामोडींमुळे उद्योजकांमध्ये चिंता आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले असून, संस्थेच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.

संस्थेच्या सदस्यांचे हित, सुरक्षित आणि पारदर्शक औद्योगिक वातावरण राखणे ही संचालकांची जबाबदारी असल्याचे सांगत, कथित गैरप्रकारांशी संबंधित व्यक्तींना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष समर्थन न देता स्टाइसच्या हितासाठी काम करावे, असे आवाहन विरोधी संचालकांनी केले आहे.

प्रकरण गंभीर, तरीही 'ते' गप्प !

नामकर्ण आवारे यांना एका सहकारी संस्थेतील गैरप्रकार प्रकरणात अटक होऊन त्यांना पोलिस कोठडीही सुनावण्यात आली आहे. इतक्या गंभीर प्रकरणानंतरही सत्ताधारी संचालकांनी मौन बाळगल्याचा आरोप विरोधी संचालकांनी केला आहे. तसेच अध्यक्षांना दिलेला पाठिंबा मागे घेण्याची मागणी वारंवार करूनही सत्ताधाऱ्यांकडून कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नसल्याचे त्यांनी नमूद केले.

Ashok Kharat case
Nashik CIDCO koyta gang attack -सिडकोत कोयता गँगचा धुमाकूळ; युवकावर हल्ला, चारचाकींची तोडफोड

सत्ताधारी संस्थेच्या प्रतिमेचा आणि हिताचा विचार करून संचालकांनी आवारे यांना चेअरमनपदावरून पायउतार करावे. त्या जागी स्वच्छ प्रतिमा, राजकारण विरहीत काम करणाऱ्या तसेच उद्योग आणि उद्योजकांचे हित जोपासणाऱ्या सुशिक्षित संचालकाला चेअरमनपदी संधी द्यावी.

- अविनाश तांबे, संचालक 'स्टाइस'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news