Nashik smart lighting complaints-स्मार्ट लायटिंग' विषयी महिनाभरात ४,२७६ तक्रारी

एलईडी दिव्यांच्या उजेडाच्या क्षमतेविषयी प्रश्नचिन्ह
Nashik smart lighting
Nashik smart lighting file photo
Published on
Updated on

नाशिक : शासनाच्या ऊर्जा धोरण- २०१७ अंतर्गत नाशिक शहरातील पथदीपांसाठी महापालिकेने पीपीपी तत्त्वावर राबविलेल्या स्मार्ट स्ट्रीट लायटिंग प्रकल्प अर्थात एलईडी दिव्यांबाबतीत गेल्या एप्रिल महिन्यात तब्बल ४ हजार २७६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यातील ९९ टक्के तक्रारींचे निराकरण करण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या विद्युत विभागातर्फे करण्यात आला असला तरी एलईडी दिव्यांच्या लक्स लेव्हलबाबत अर्थात प्रकाश क्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

Nashik smart lighting
Nashik CIDCO koyta gang attack -सिडकोत कोयता गँगचा धुमाकूळ; युवकावर हल्ला, चारचाकींची तोडफोड

strrt lightमहापालिकेच्या माध्यमातून २०२० मध्ये सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) शहरातील पथदीपांवरील सोडियम दिवे बदलून एलईडी दिवे बसविण्याचा प्रकल्प टाटा प्रोजेक्टस कंपनीमार्फत राबविण्यात आला. या प्रकल्पाची सुरुवातच वादातून झाली होती. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून कसाबसा हा प्रकल्प साकारला गेला. अखेर शहरातील १ लाख पाच हजार पथदीपांवर वीजबचत करणारे स्मार्ट एलईडी दिवे बसविण्यात आले. डिसेंबर २०२० पासून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. हा प्रकल्प महापालिकेची वीजबचत करणारा, प्रसंगी वीजबिलावर होणाऱ्या खर्चात कोट्यवधींची बचत करणारा असला, तरी एलईडी दिवे बंद असणे, पथदीप नादुरुस्त असणे, वीजबचत दाखविण्यासाठी संपूर्ण लाइन बंद ठेवली जाणे यांसारख्या तक्रारी या प्रकल्पाविषयी कायम आहेत.

गेल्या एप्रिल २०२६ च्या महिनाभरातच तब्बल ४ हजार २७६ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ४ हजार २६५ तक्रारींचे निराकरण करण्यात महापालिकेला यश आले आहे. ११ तक्रारी प्रलंबित आहेत. नवीन १२ पथदीप उभारण्याची मागणी नागरिकांकडून प्राप्त झाली होती. त्यापैकी ११ ठिकाणी पथदीप बसविण्यात आले आहेत, अशी माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल गायकवाड यांनी दिली आहे.

Nashik smart lighting
Nashik Mohadi Sarpanch post cancelled - अतिक्रमण भोवले; मोहाडी सरपंचांचे पद रद्द

लक्स लेव्हल म्हणजे काय ?

लक्स लेव्हल म्हणजे प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे, जे एका विशिष्ट पृष्ठभागावर किती प्रकाश पडतो हे दर्शवते. हे प्रकाशयोजनेत महत्वाचे आहे. १ लक्स म्हणजे १ चौरस मीटर पृष्ठभागावर १ लुमेन प्रकाश प्रवाह. हे पृष्ठभागावर पडणाऱ्या प्रकाशाच्या तीव्रतेचे मोजमाप आहे.

७२ तासांत तक्रारींचे निवारण गत साडेपाच वर्षांपासून हा प्रकल्प सुरळीत सुरू आहे. या प्रकल्पात महापालिकेने कोणतीही भांडवली गुंतवणूक केलेली नाही. रस्त्यावर राष्ट्रीय मानांकनाप्रमाणे प्रकाशाची तीव्रता निश्चित करण्यात आली आहे. तक्रारींचे निराकरण ७२ तासांच्या आत केले जाते.

- अनिल गायकवाड, कार्यकारी अभियंता, विद्युत, महापालिका

तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक

पथदीपांविषयी तक्रार करण्यासाठी महापालिकेने टोल फ्री क्रमांक १८००२६७७९५३ उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या अॅपवरही २४ तास तक्रार निवारण प्रणाली कार्यरत आहे. ७२ तासांच्या आत तक्रारीचे निराकरण केले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news