Deep Amavasya : घरोघरी दिव्यांची साफसफाई, आज दीप अमावस्या

Hindu festival : दीप अमावस्यानिमित्त नाशिककरांनी घरातील दिव्यांची केली सफासफाई
Deep Amavasya 2024
आषाढ महिन्यातील अमावस्या अर्थात दीप अमावस्याpudhari news network
Published on
Updated on

नाशिक : आषाढ महिन्याची अमावस्या अर्थात दीप अमावस्या रविवारी (दि. ४) घरोघरी साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने नाशिककरांनी घरातील दिव्यांची सफासफाई केली. (Amavasya in the month of Aashaadha that is Deep Amavasya is being celebrated from house to house.)

Deep Amavasya 2024
Shravan Somwar 2024: यंदा श्रावणात आला ७१ वर्षांनी दुर्मीळ योग

हिंदु धर्मात आषाढ अमावस्या अर्थात दीप अमावस्येला विशेष असे महत्व आहे. या दिवशी दिव्यांची खास आरास करताना त्यांचे पूजनही करण्यात येते. दिव्याला मांगल्य, समृद्धी व चैतन्याचा प्रतिक मानले जाते. आपल्या आयुष्यात सुख-समृद्धी येण्यासाठी दीप अमावस्येला दिव्यांचे पूजन केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार अंधारातूशाकडे नेण्याचा हा मार्ग असल्याचे म्हटले जाते. या दिवशी स्नान, दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्त्व आहे. दरम्यान, दीप अमावस्या रविवारी साजरी केली जाणार आहे. शनिवारी (दि. ३) दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी अमावस्या सुरु झाली आहे. रविवारी (दि. 4) रोजी दुपारी 4 वाजून 42 मिनिटांनी संपणार आहे. त्यामुळे नागरिकांनी शनिवारीच (दि.3) घरातील दिव्यांची स्वच्छता करण्यात आली.

असे करावे पूजन

दीप अमावस्येला पहाटे लवकर उठून स्नान करावे. तसेच स्वच्छ वस्त्र परिधान करावे. घरातील सर्व दिवे स्वच्छ करुन घ्यावे. त्यानंतर देवघरासमोर पाट किंवा चौरंग मांडत त्याच्याभोवती रांगोळी काढावी. पाटावर लाल रंगाचे वस्त्र अंथरुन निरांजन, समई आणि पिठाचे दिवे मांडत त्याचे पूजन करावे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news