नाशिक : दत्त जयंतीनिमीत्त गुरवारी (दि. ४) शहरातील विविध दत्त मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दत्त मंदिराना आकर्षक विद्युत रोषणाईसह फुलांची आरास करण्यात आली आहे.
सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदाघाटावरील एकमुखी दत्त मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्यात आले. दत्त जयंती उत्सवानिमित्त आठवडाभरापासून विविध धार्मिक कार्यक्रम झाले. या काळात हजारो भाविकांनी गुरुचरित्र पारायणासाठी व दर्शनासाठी गर्दी केली होती. एकमुखी दत्त मंदिरात पहाटे साडेपाचला अभिषेक होईल. सायंकाळी सव्संवासहाला दत्त जन्मोत्सव सोहळा होणार आहे, अशी माहिती एकमुखी दत्तमंदिराचे मठाधिपत्ती मुयरेश बर्वे यांनी दिली. सिडकोतील दत्त मंदिर, देवळालीतील दत्त देवस्थान, जुने नाशिकरोडचे दत्त मंदिर, इंदिरानगरचे गुरूदेव दत्त, सातपूरचे जुने गुरुदेव दत्त मंदिर, गोदाघाटावरील एकमुखी दत्त मंदिरात कार्यक्रम होणार आहे.