Balasaheb Thorat | सहकार मोडित काढण्याचा डाव

Balasaheb Thorat | काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचा राज्य सरकारवर घणाघाती आरोप
Balasaheb Thorat
Balasaheb Thorat
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सत्ता नसलेल्या ठिकाणी चोरट्या मार्गाने नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार नियम आणि कायदे बदलत असून, महाराष्ट्रातील सहकार व्यवस्था मोडित काढण्याचा हा मोठा कट आहे. मुख्यमंत्र्यांनी या पापाचे धनी होऊ नये, असा संताप इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी येथे दिला.

Balasaheb Thorat
Simhastha Kumbh Mela | नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आखाड्यांच्या निधीत घसघशीत वाढ; प्रत्येकी 7 कोटी मिळणार

काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र आढावा बैठकीसाठी थोरात नाशिक येथे आले असता, गुरुवारी (दि. ५) त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. थोरात म्हणाले की, महाराष्ट्रातील अग्रगण्य असणाऱ्या गोकुळ दूध संघास साडेपाच लाख शेतकरी जोडलेले आहेत.

आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या पॅनलला १३ जागांचे स्पष्ट बहुमत मिळाले असतानाही केवळ १४ च्या कोरचा नियम आड आणून अध्यक्षनिवड रोखली जात आहे. हा कोरचा नियम तातडीने दुरुस्त केला पाहिजे. मात्र, शासन चार स्वीकृत सदस्य नेमून नियमबाह्य पद्धतीने सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे.

ही केवळ एका दूध संघापुरती बाब नसून, सहकारी बँका, साखर कारखाने आणि विकास सोसायट्या ताब्यात घेण्याचा षडयंत्र आहे. सहकाराचा हा पाया मोडून शेवटी राज्यातील दूध व्यवसाय 'अमुल'च्या घाशात घालण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप थोरात यांनी केला.
याविरोधात कोल्हापूरमध्ये निघणाऱ्या देशव्यापी आंदोलनाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नाशिक कुंभमेळ्याच्या नियोजनावर टीका करताना ते म्हणाले की, देवाच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार सुरू असून, अयोध्येत जे घडले, तेच नाशिकमध्ये चालले आहे. केवळ आरतीसाठी १८ कोटी रुपये खर्च करण्याऐवजी तो निधी टँकर आणि पाणीपुरवठ्यासाठी वापरला असता, तो जनतेचे आशीर्वाद मिळाले असते. नाशिककरांना सध्या सुरू असलेला हा गोंधळ उघड्या डोळ्यांनी दिसत असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

Balasaheb Thorat
Traffic Diversion | दिवाळी खरेदीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात विशेष वाहतूक बदल; सात प्रमुख मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी

दुष्काळात मदत तशी

राज्यातील भीषण परिस्थितीवर बोलताना थोरात म्हणाले की, मी १९७२ चा दुष्काळ पाहिला आहे. सध्याची सुरुवात अत्यंत चुकीची आहे. हेक्टरी पाच हजार रुपयांच्या टोकदार मदतित शेतकरी पुढील १० महिने कसा जगेल? शेतकरी, शेतमजूर आणि बारबलुतेदार यांचा विचार शासनाने केलेला नाही. जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार असून, धरणात पाणी असले, तरी काटकसरीने नियोजन करणे आणि मोठ्या प्रमाणावर चारा पिके घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

सहकारात राजकारण नको

जिल्हा बँक ही मातृसंस्था असून, सहकार टिकला, तर इतर संस्था चांगल्या चालतात, हे नाशिकच्या स्थितीवरून लक्षात येते. निवडणुका आणि पक्षीय राजकारण वेगळे असले, तरी सहकारात व्यक्तिद्वेष बाजूला ठेवून एकत्र काम करण्याची परंपरा आम्ही जपली आहे. म्हणूनच आमची अहिल्यानगर बँक आज सुरक्षित आहे. पुढच्या दसऱ्यालाही आम्ही सगळे एकत्र जेवायला बसू आणि सहकारातील हा जिव्हाळा टिकवून ठेवून, असे थोरात यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.