

नाशिक : येथे शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादीला सुरूंग लावल्यानंतर भाजपने आपला मोर्चा आता काँग्रेसकडे वळविला आहे. काँग्रेसचे तीन माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर असून, लवकरच त्यांचा प्रवेश घडवून आणला जाणार असल्याची चर्चा आहे.
आगामी महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठाला सुरूंग लावला आहे. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे ३५ नगरसेवक निवडून आले होते. त्यातील पाच माजी नगरसेवक भाजपमध्ये, तर तब्बल २२ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
उबाठाच्या तीन माजी नगरसेवकांचे निधी झाले आहे. त्यामुळे आता उबाठाकडे जेमतेम पाच माजी नगरसेवक उरले आहेत. राष्ट्रवादीतूनही गणेश गिते यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. आता भाजपने काँग्रेसकडे आपला मोर्चा वळविला आहे. काँग्रेसमधील तीन माजी नगरसेवकांना भाजपने गळाला लावल्याची चर्चा असून, या तीन माजी नगरसेवकांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे गेली कित्येक वर्षे काँग्रेसची 'संस्कृती' जोपासणाऱ्या जुन्या- जाणत्या माजी नगरसेवकांच्या हाती कमळ दिसणार आहे.