

नाशिक : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाद्वारे आयोजित सर्वोत्कृष्ट निरीक्षणगृहाचा 2024 चा बालस्नेही पुरस्कार नाशिकमधील मुलींचे निरीक्षण गृह व बालगृहाला जाहीर झाला आहे.
सदर पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट येथे सोमवारी (दि. 3) दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे. प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे व महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे हे उपस्थित राहणार आहेत.
पुरस्काराची माहिती राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अवर सचिव वंदना जैन यांनी पत्राद्वारे कळविली आहे. या पुरस्काराबद्दल मुलींचे निरीक्षणगृह बालगृहच्या पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या मुलींचे निरीक्षण गृह बालगृहाचे मानद सचिव म्हणून चंदुलाल शाह हे गेल्या 48 वर्षांपासून काम पाहत आहेत. यापूर्वीही या मुलींचे निरीक्षणगृह बालगृहाला अनेक संस्था, संघटनांकडून पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.